लातूर :-(प्रतिनिधी )
येथील श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय शिकाऊ चित्रपट निर्माता आकाश पंडित जाधव यांचा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड आणि उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.विजयकुमार सोनी, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.संजय गवई, डॉ.कैलास पाळणे आणि अनिकेत स्वामी यांची उपस्थिती होती.
आकाश पंडित जाधव हे लातूरचे सुपुत्र असून त्यांनी लातूरमध्ये माध्यमिक आणि पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. बांगलादेश व पश्चिम बंगाल चित्रपट इंडस्ट्रीतर्फे गोवा येथे २० ते २८ नोव्हेंबर २०२२मध्ये होणाऱ्या फिल्मफेअर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय शिकाऊ चित्रपट निर्माता म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. सध्या आकाश जाधव हे बांगलादेश संलग्नित कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माता म्हणून प्रशिक्षण पूर्ण करीत आहे. त्यांच्या या उज्ज्वल आणि प्रेरणादायी यशाबद्दल श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय संस्था पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, शाखा समन्वयक, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments