*स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास,स्वयंअध्ययन , संलग्नतेला खुप महत्व- सीईओ अभिनव गोयल*
*स्पर्धेच्या युगात स्वप्न मोठे पहा - डॉ रत्नराज जवळगेकर*
*ज्युनिअर आय ए एस स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा संपन्न*
लातूर:- (प्रतिनिधी)
संस्कार ज्युनिअर आयएएस काॅमिटेशन 2021-22 या शालेय स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ रविवारी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी ११वाजता दयानंद सांस्कृतीक सभागृह, दयानंद काॅलेज बार्शी रोड लातूर येथे पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद लातूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अभिनवजी गोयल तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ रत्नराज जवळगेकर मुख्य वित्त व लेखाधिकारी जि.प. लातूर, मा. नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आय ए एस , माजी कुलगुरू प्राचार्य मधुकरराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
वर्ष 2013 पासून प्राथमिक स्तरापासून भविष्यातील स्पर्धा परीक्षांची तयारीची सुरुवात व्हावी म्हणून ज्युनिअर आयएएस काॅमिटेशन या शालेय स्पर्धा परीक्षा चे मराठी,सेमी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यासाठी दर वर्षी आयोजन केले जाते.महाराष्ट्रातील 22 -23 जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प कार्यरत आहे.
ज्युनिअर आय ए एस स्पर्धा परीक्षेचे यशस्वी आयोजन करत असल्याबद्दल मानव्य विद्याशाखेचे सदस्य,संस्कार प्रकाशनचे संचालक ओमप्रकाश जाधव यांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
डॉ रत्नराज जवळगेकरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना स्वप्न मोठे पहावे , सामुहिक चर्चा करावी आपल्याला येत असलेले मुद्दे दुसऱ्याना सांगावे त्यांचे मुद्दे ही ऐकावे , स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे ज्या क्षेत्रात जातील त्या क्षेत्रात एक नंबर असतील.
मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी स्पर्धा परीक्षेतील आपले अनुभव कथन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थी सोयीसुविधा उपलब्ध नाहीत असे न म्हणता स्वयं अध्ययन करावे स्वयं अध्ययनाने यश संपादन करता येते. आत्मविश्वास किती महत्त्वाचा आहे हे सांगताना स्वतः चे उदाहरण दिले युपीएससी च्या परीक्षेच्या एक महिना आजारी पडले. तीन तास परीक्षा देणे शक्य नाही असे डॉक्टरांनी सांगितले तरी जेवढा वेळ बसता येईल त्या वेळेत मी पेपर सोडवून शकतो असा त्यांचा विश्वास होता. अश्या परिस्थितीत त्यांनी परीक्षा दिली आणि ते यशस्वी उत्तिर्ण होऊन आज लातूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले असे सांगितले तर माझ्यात आत्मविश्वास नसता तर आय ए एस झालो नसतो. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे.तसेच अभ्यासात सातत्य ठेवावे. अभ्यास संलग्न करावा. यश नक्की मिळेल.हे यश एकट्याचे नसते तर यासाठी आपल्याला ज्यांनी इथपर्यंत येण्यासाठी मदत केली त्याचेही महत्त्वाचे योगदान असते.
ज्युनिअर आय ए एस स्पर्धा परीक्षेतील ६७ गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेशचंद्र काठोळे तर आभार कुलकर्णी सरांनी केले

Post a Comment
0 Comments