Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*राहूल गांधी यांना निलंग्यात भाजपाचे जोडे मारो आंदोलन.*


*राहूल गांधी यांना  निलंग्यात भाजपाचे जोडे  मारो आंदोलन.*

 निलंगा:- (प्रतिनिधी)

भारत जोडो याञेत एका सभेमध्ये स्वातंत्र्य विर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून देश हितासाठी आपल्या प्राणाची आहूती देणाऱ्या विर सावरकृर यांच्या जीवनचरिञावर शिंतोडे उडवणारे विधान केल्यामुळे काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या बॕनरला निलंगा  भारतीय जनता पार्टीच्या पदाधिका-यांच्या  वतीने शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात दिनांक १९ रोजी सकाळी ११.०० वाजता   राहुल गांधी यांच्या  प्रतिमेला जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष  शाहूरज थेटे, शहराध्यक्ष  विरभद्र स्वामी, युवा शहराध्यक्ष  तम्मा माडिबोने,माजी उपनगराध्यक्ष  मनोज कोळ्ळे,माजी नगरसेवक  शरद पेठकर, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष  सुमित ईनानी, डॉ हातागळे,पप्पू तेलंग, भगवान वरवटे,नयन माने,अविराज पाटील,प्रशांत पाटील, नागेश पाटील, मारूती नागदे, खदीर मासुलदार, सचिन गायकवाड,रवि कांबळे, रमेश कांबळे,आनंत पेठकर, आकाश पेठकर, मंगेश गाडिवान,माधव पटणे,राम पाटील काका,फरीद आक्तार,पिंटू पाटील, पिंटू पांचाळ,भुरके आप्पा, प्रकाश पाटील, प्रकाश पटणे, आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments