महात्मा बसवेश्वरांच्या वैश्विक विचारांची समाजात प्रत्यक्ष कृती आवश्यक उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे
लातूर :-(प्रतिनिधी)
महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केला त्यांचा आदर्श घेऊन महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे पवित्र कार्य आपल्या सुरू केले. माणुसकीच्या प्रतिष्ठापनेसाठी महात्मा बसवेश्वरांनी क्रांतिकारी आणि मानवतावादी कार्य केले तेव्हा या विचाराची मानवी जीवनात प्रत्यक्ष कृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे यांनी केले.
जगतज्योती सोमवार समुहद्वारा सातत्यपूर्ण उपक्रमाचा ९५वा सोमवारनिमित्त आज जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या सिहासनारुढ पुतळ्यास महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे यांच्या हस्ते पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. यावेळी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.विजयकुमार सोनी, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.शिवप्रसाद डोंगरे, डॉ.संजय गवई, प्रा.आशीष क्षीरसागर, बसव ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बसवेश्वर हेंगणे, बसवसेवा संघाचे बालाजीप्पा पिंपळे, सुर्यकांत वाले, मधुकर निकुंबे, विरेश कोरे, गजाननप्पा मुंडेकरी, नानासाहेब हंडरगुळे, प्रकाशप्पा कोरे, संदीप मोरे, बालाजी होनराव, विष्णू पैलवान व शुभम बिराजदार आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.राजकुमार लखादिवे म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांनी लोकशाही समाज जीवनाचा पुरस्कार केला म्हणूनच त्यांचे विचार विश्वव्यापी आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संजय गवई यांनी केले तर आभार डॉ.विजयकुमार सोनी यांनी मानले.

Post a Comment
0 Comments