“भारतीय संविधान हे विश्वाला प्रेरणादायी”
प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड.
लातूर :-( प्रतिनिधी)
भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित आणि सर्वोच्च उत्कृष्ट आहे त्यामुळेच भारतामध्ये शांतता, स्थैर्य, सुव्यवस्था आणि गतिमान परिवर्तनशीलता प्रवाहित होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे भारतीय संविधान ही संपूर्ण विश्वाला प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचलित मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय (गुणवंत) वसतीगृह, लातूर येथे 'सामाजिक न्याय पर्व' कार्यशाळेत ते उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक पी.एल.बारकुल हे होते तर विचारमंचावर गृहपाल किर्दंत, आकांक्षा कांबळे आणि प्रेम शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाला सर्व मान्यवरांनी विनम्र अभिवादन केले.
पुढे बोलताना डॉ.श्रीकांत गायकवाड म्हणाले की, भारतीय संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे. संविधानामुळेच भिन्न जाती-धर्माच्या लोकांना समानतेच्या पातळीवर जीवन जगण्याची संधी प्राप्त झाली आहे. तसेच सनदशीर व शांततामय मार्गाने भारतीय समाजात सुधारणा घडवून यावी म्हणून संविधानात ज्या मूलभूत हक्काच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या स्वतंत्रता, अस्मिता व अस्तित्व जोपासण्यासाठी उपयुक्त ठरतात असेही ते म्हणाले.
हा कार्यक्रम समाज कल्याण विभाग लातूरचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार आणि सहाय्यक आयुक्त शिवकांत चीकुर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल ठाकरे यांनी केले तर आभार आकांक्षा कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक श्रीराम शिंदे, मनोज मोरे, गणेश बेडगे, दत्तात्रय शिंदे, नागेश जाधव, अमोल मुळे, संकेत बनसोडे, स्वप्निल ठाकरे आणि गंगाधर जोगदंडकर यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments