*देवणी तालूक्यातील गावाचे ग्राम पंचायत निवडणुकीवर बहिष्कार*
देवणी:-(प्रतिनिधी)
तालूक्यातील बोंबळी बु हे गावातील नागरीकांनी ग्राम पंचायत निवडणूकीवर बहीष्कार टाकला बोंबळीतील नागरीकांस या बहीष्काराचे करण्याचे कारण आज रोजी गावातील मंदीरात बैठकीत विचारले आस्ता देवणीचे तहसीलदार सूरेशजी घोळवे, व बीडीओ व तलाठी उत्तम जाधव यानी विचारले व बैठक ही ११:०० वा पासून १२:०० पर्यंत चालली व गावातील नागरीकांनी गावातील रस्ते, पाणी, व शाळांची दुरावस्था तहसीलदार साहेबांना प्रत्यक्ष दाखवली व तहसीलदार साहेब व बीडीओ साहेबांनी मतदान करा व बहीष्कार बंद करा आसे नागरीकांना विनंती केली माञ बोंबळी तील नागरीक आमची ग्राम पंचायत स्वतंञ करून द्यावी नाही तर आम्ही कर्नाटकात सामील होऊं व जो पर्यंत आमची ग्राम पंचायत स्वतंञ होत नाही तो पर्यंत आम्ही मतदानावर बहीष्कार टाकन्याचा निर्णय घेतला आहे आसे गावातील नागरीकांनी तहसीलदार साहेबा समोर सांगीतले तर उपस्थीत नागरीक संतोष पाटील प्रकाश शिंदे ज्ञानोबा कारभारी परमेश्वर कांबळेअरविंद सूर्यवंशी शिवाजी लांडगे सूर्यवंशी अभंग चंद्रकांत लांडगे अनिल लांडगे महाराष्ट्र शासनाच्या योजनांपासून वंचित बोंबळी ग्रामपंचायत – निवडणुकीवर बहिष्कार टाकून कर्नाटकात सामील होण्यासाठी ग्रामस्थांचे तहशिलदारांचे आवाहन.
महाराष्ट्र-बेळगाव सीमाप्रश्न पुन्हा तापला असून, यावरून दोन्ही राज्यांमध्ये जोरदार वाद रंगला आहे. दरम्यान, बीदर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी ग्रामपंचायतीच्या लोकांनीही महाराष्ट्र सोडून कर्नाटकात सामील होण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील बोंबळीचे गावकरीही कर्नाटकात सामील होण्याच्या तयारीत आहेत. गावात बैठक घेणाऱ्या ग्रामस्थांनी महाराष्ट्र सरकार गावांचा विकास न करून भेदभाव करत असून कर्नाटक सरकारने शेतकरी व गोरगरीब जनतेसाठी चांगले लाभ व योजना निर्माण केल्या असून त्यांचा कर्नाटकात समावेश करावा असे सांगितले बोंबळी ग्रामस्थांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या अनेक मागण्या :
१. शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा. २. मुलांना शाळेत शिकण्यासाठी चांगली व्यवस्था करावी.
३. बसचे भाडे कमी करावे.
४. कर्नाटक सरकारकडून शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मिळाले. आम्हाला अनुदान उपलब्ध करून द्यावे.
५. स्थानिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी एमबीबीएस डॉक्टरची नियुक्ती करावी.
६. शेतीसाठी १० एच. पी. पर्यंत मोफत वीज देण्यात यावी ही सर्व यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments