विलासराव देशमुख फाउंडेशन आणि मेट्रोपोलीस फाउंडेशनच्या उडाण उपक्रमास महापूर येथील युवकयुवतींचा चांगला प्रतिसाद
लातूर (प्रतिनिधी)
विलासराव देशमुख फाउंडेशन आणि मेट्रोपोलीस फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने उडाण हा अभिनव उपक्रम ट्वेंटीवन ॲग्री. लि. च्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून महापूर येथे राबविला जात आहे. या उपक्रमास लातूर तालुक्यातील महापूर येथील युवक युवतींचा चांगला प्रतिसाद मिळाला असून त्यांना यातून स्वसरंक्षण, स्वयंमरोजगार बाबतचे शिक्षण आणि
प्रशिक्षण देण्यात येत आहे.
विलासराव देशमुख फाउंडेशन आणि मेट्रोपोलीस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उडाण उपक्रम गेल्या एक महिन्यापासून महापूर या ठिकाणी सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून युवक युवतींना स्वयंरोजगार करता यावा, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, त्यांना भविष्यात विविध क्षेत्रात आत्मविश्वासाने सामोरे जाता यावे यासाठी प्रकल्पाच्या माध्यमातून शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यात आले.
उडान प्रकल्पामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी महापूर येथील ९६ युवक आणि १०३ युवती असे एकूण १९९ युवक व युवतींनी आपला प्रवेश नोंदविलेला आहे. विलासराव देशमुख फाउंडेशन आणि मेट्रोपोलिस फाऊंडेशनच्या संयुक्त
विद्यमाने त्यांना वेगवेगळे कौशल्य वाढविणारे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
यावेळी महापूर येथील विद्यार्थी यांच्या सोबत पालकांशी देखील संवाद साधण्यात आला. येथील प्रशिक्षणात स्वसंरक्षण, व्यक्तीमत्व विकास, शिक्षणातून उपलब्ध होणाऱ्या रोजगार संधी या बाबत मार्गदर्शन करण्यात येत अहे. येथे प्रशिक्षण घेतलेल्या विदयार्थ्यांनी सादरीकरणही करून दाखवीले.
यावेळी चांगले सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.या कार्यक्रमास गावातील नागरीकांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला. विलासराव
देशमुख फाऊंडेशनच्या अभिनव उडान उपक्रमाबद्दल पालकांनी आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर सौ. अदिती अमित देशमुख यांनी महापूर येथे हा उपक्रम राबविला याकरीता त्यांचे आभार मानले.
महापूर येथे उपक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनच्या समन्वयक संगीता मोळवणे , उडान प्रकल्पाचे समन्वयक अविनाश देशमुख, मीर करपुडे, सोशल प्लॅनरगजानन बोयणे, प्रशिक्षक रवीकुमार शिंदे, सहकारी सोमनाथ कावळे, मेघराज
देशमुख प्रयत्न केले.

Post a Comment
0 Comments