*हॉस्पिटलला सलग्णीत मेडिकल दुकानातुनच औषधी घेण्याची सक्ती केल्यास प्रशासन कारवाई करणार*
लातुर:-( प्रतिनिधी)
- संपूर्ण महाराष्ट्रात रुग्ण हक्काच्या संरक्षणार्थ कार्यरत असणारी एकमेव रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र टिमचे समिती प्रमुख ॲड.निलेश करमुडी व प्रदेशअध्यक्ष हनमंत गोत्राळ यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तहसिलदार यांना हॉस्पिटल सलग्णीत मेडिकल दुकानातुन औषधी घेण्याची सक्ती करणाऱ्या हॉस्पिटल वर कारवाई करा या मागणीचे निवेदन संपुर्ण महाराष्ट्रातुन देण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये सलग्णीत असलेल्या त्याच मेडिकल दुकानातुन औषधी घेण्याची सक्ती रुग्ण नातेवाईकावर केली जात असे बाहेर दुकानातुन औषधी अल्प दरात व सवलतीच्या दरात भेटतात पण आमच्याच मेडिकल दूकानातुन औषधी घेण्याची सक्ती अनेक ठिकाणी केली जाते यामूळे मोठ्या प्रमाणात रुग्णांची आर्थिक लुट व पिळवणूक होत होती हि लुट व मनमानी थांबावि याकरीता रुग्ण हक्क संरक्षण समितीने संपुर्ण महाराष्ट्रातुन रुग्ण जागृती करत निवेदने दिली याची दखल प्रशासनाने घेत हॉस्पिटलमध्ये सलग्णीत असलेल्या मेडिकल दुकानातुन औषधी घेण्याची सक्ती करण्यात येऊ नये अन्यथा कारवाई करु असे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दि.०९ डिसेंबर २०२२ रोजी काढुन रुग्णांना दिलासा दिला आहे याबद्दल रुग्ण हक्क संरक्षण समितीचे समिती प्रमुख ॲड.निलेश करमुडी, प्रदेशअध्यक्ष हनमंत गोत्राळ, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण,महिला प्रदेशअध्यक्षा रेणुकाताई बोरा,प्रदेश संपर्कप्रमुख विनोद इघवे, प्रदेशसंघटक नरेंद्र बोरा, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख धनाजी जोशी, उत्तर महाराष्ट्र प्रमुख अशोक पालक, विदर्भ विभागप्रमुख रविंद्र मेश्राम, मराठवाडा महिला अध्यक्षा पुजाताई निचळे, मराठवाडा अध्यक्ष प्रा.शिवाजीराव नवरखेले, मराठवाडा कार्याध्यक्ष रामेश्वर गंगावणे, मराठवाडा संपर्कप्रमुख प्रा.शंकरराव सोनवणे,मराठवाडा संघटक रवि बिजलवाड, लातुर जिल्हाध्यक्ष दिपक गंगणे , लातुर महिला जिल्हाध्यक्षा कावेरी विभुते, पुणे जिल्हाध्यक्ष अमोल शिंगनाथ, सोलापुर जिल्हाध्यक्ष सुमित भांडेकर,सोलापुर शहरअध्यक्ष अकबर शेख, अकोला महिला जिल्हाध्यक्ष संगिता भंडारे, गोंदिया जिल्हाध्यक्ष प्रविण बिसेण, परभणी जिल्हाध्यक्ष दालीप बनकर,परभणी महिला जिल्हाध्यक्ष अनिताताई सरोदे, परभणी जिल्हाउपाध्यक्ष रमेश घनघाव, ठाणे जिल्हाध्यक्ष तात्याराव सोनवणे, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिभाऊ गवळी, बुलढाणा जिल्हाध्यक्ष देवेंन्द्र जैस्वाल, बुलढाणा महिला जिल्हाध्यक्ष अर्चना बावसकर, नाशिक जिल्हाध्यक्ष जयाजी यादमाळ, नाशिक महिला जिल्हाध्यक्षा पद्मीनीताई शिंदे आदि सर्व जिल्हाध्यक्ष महिला पदाधिकारी तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी प्रशासनाचे आभार मानले

Post a Comment
0 Comments