*तगरखेडा गावात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न*
*कबड्डी व व्हाॅलीबाॅल स्पर्धेत तगरखेडचा द्वितीय क्रमांक*
निलंगा:-( प्रतिनिधी/शिवाजी निरमनाळे)
नेहरू युवा केंद्र लातूर युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार द्वारा निलंगा व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील १५ ते २९ वयोगटातील युवक युवतींसाठी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तगरखेडा ता.निलंगा येथे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन तगरखेडा गावचे सरपंच केवलाबाई सूर्यवंशी व उपसरपंच मदन बिरादार, माजी सरपंच तानाजी थेटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी, व्हाॅलीबाॅल, १०० मीटर धावणे, लांब उडी , उंच उडी इ. खेळ घेण्यात आले.
या क्रीडा स्पर्धेमध्ये व्हॉलीबॉल च्या मुलांच्या 8 संघाने भाग नोंदविला व या व्हॉलीबॉल स्पर्धा मध्ये यशवंती क्लब निलंगा ने प्रथम क्रमांक मिळवला व तगरखेडच्या साहारा स्पोर्ट क्लब ने द्वितीय क्रमांक मिळवला.
कबड्डी मुलींच्या संघामध्ये निलंगा संघाने प्रथम क्रमांक व तगरखेडच्या समता विद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळवला.
कबड्डी मुलांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक स्वराज क्लब निलंगा याने पटकावले. व तसेच 100 मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी अशा स्पर्धा पार पडल्या या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साहारा स्पोर्ट क्लब व समस्थ तगरखेडा ग्रामस्थांनी परिश्रम घेतले .
विशेष आयोजन समिती दिपक पाटील, शिवाजी बिरादार, मदन बिरादार, खुशाल पाटील, शेषेराव बिरादार, तानाजी थेटे यांनी काम पाहिले.
*तगरखेडा गावचे सुपुत्र व्हाॅलीबाॅलचे नॅशनल कोच दिपक पाटील यांच्या प्रयत्नामुळे ग्रामीण भागात क्रीडा स्पर्धेकडे युवक युवतींचा कल वाढला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल आम्ही तगरखेडकर ग्रूप च्या वतीने त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.*

Post a Comment
0 Comments