निलंगा :- निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथील तेरणा नदीकाठी असलेले मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयात संगीत विभाग व कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रदीप पाटील यांनी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळेस संगीत विभागप्रमुख प्रा.दुर्गादास सबनीस यांनी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी डॉ.विजयकुमार पवार, डॉ.मोहन बंडे, प्रा.मुश्ताक रक्साळे, प्रा.दगडू मुंडे, मल्लिकार्जुन येरटे, व्यंकट शिवणे, राजेंद्र बेलूरे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
*तेरणेकाठी असलेल्या मंगेशकर महाविद्यालयात मास्टर दीनानाथ मंगेशकर जयंती उत्साहात साजरी*
December 29, 2022
0
*मंगेशकर महाविद्यालयात मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची जयंती साजरी*

Post a Comment
0 Comments