Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*भाजपा व गद्दार सेनेने कितीही ताकद लावली तरीही शिवसेना नव्या जोमाने उभारी घेणार....जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने*

*भाजपा व गद्दार सेनेने कितीही ताकद लावली तरीही शिवसेना नव्या जोमाने उभारी घेणार....जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने*

निलंगा /प्रतिनिधी
 वंदनीय शिवसेनाप्रमुखांनी उभं केलेल्या शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपा व गद्दार सेनेने कितीही ताकद लावली तरीही शिवसेना नव्या जोमाने उभी राहणार असे लातूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी नेलवाड येथील नूतन शिवसेना सरपंच व सदस्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना मत व्यक्त केले. 
    निलंगा तालुक्यातील कर्नाटक सीमेलगत असणाऱ्या मौजे नेलवाड ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे बजरंग दादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी व तेथील स्थानिक आमदार तसेच गद्दार सेना यांनी शिवसेना व शिवसेनेचे नेतृत्व संपवण्यासाठी जो घाट घातला होता जी ताकद लावली गेली होती याला शिवसेना पुरून उरली व शिवसेनेचा भगवा नेलवाड ग्रामपंचायतवर फडकला यावेळी शिवसेनेचे सरपंच व सदस्यासह संपूर्ण ग्रामस्थांचे शिवसेनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने बजरंग दादा जाधव यांच्यासह उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे  युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख अण्णासाहेब मिरगाळे, तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख अर्जुन नेलवाडे हे आवर्जून उपस्थित होते
*चौकट*
 या सत्कार सोहळ्याप्रसंगीच डीपी जळाल्या कारणाने पंधरा दिवस झाले लाईट बंद असल्याची तक्रार जिल्हाप्रमुखासमोर व्यक्त केली तेव्हा तात्काळ जिल्हाप्रमुखांनी कार्यकारी अभियंता पवार  यांच्याशी संपर्क साधून तात्काळ डीपी देण्यास सांगितले व आज तो डीपी बसला व लाईट ही चालू झाली यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले
याचबरोबर हसोरी खुर्द ही ग्रामपंचायत ही शिवसेनेच्या ताब्यात आल्याकारणाने तेथील सरपंच व सदस्यांचाही जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळीही हरिभाऊ सगरे अविनाश दादा रेशमे प्रशांत वांजरवाडे अण्णासाहेब मिरगाळे अर्जुन नेलवाडे हासोरीचे माजी सरपंच आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments