निलंगा:-(प्रतिनिधी)
निलंगा तालुक्यातील शेडोळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्री विशाल मधुकरराव धुमाळ यांची ४ जानेवारी रोजी लोकनियुक्त सरपंच श्री स्वरूप विठ्ठलराव धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक निर्णय अधिकारी तथा निलंगा पं.स कृषी विस्तार अधिकारी श्री विशाल ढाकणे साहेब यांच्या उपस्थितीत गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्री स्वरूप धुमाळ थेट जनतेतून बहुमताने निवडून आले. दि.4 जानेवारी रोजी उपसरपंच निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन केले होते ..उपसरपंच पदासाठी श्री विशाल धुमाळ यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.ढाकणे यांनी श्री विशाल धुमाळ यांची उपसरपंच म्हणून निवड झाल्याचे जाहीर केले.
या निवडीसाठी ग्रामसेवक सौ. परचंडराव मॅडम व तलाठी श्री बिराजदार साहेब यांनी सहाय्य केले..
सदर निवड ही भाजपा ज्येष्ठ नेते श्री व्यंकटराव (अप्पा) रंगराव धुमाळ यांचे मार्गदर्शनात करण्यात आली या बैठकीस नूतन सदस्य श्री संजय शंकर कांबळे,श्री सुरेश केरबा आवले , कुसुमबाई दिपक धुमाळ, विजयाबाई शेषराव लोंढे, प्रयागाबाई त्र्यंबक दूधभाते ,अनिता नितीन धुमाळ शामल कमलाकर धुमाळ ई सह शेडोळ येथील प्रतिष्ठित नागरिक श्री सतिष भिमराव धुमाळ, श्री गोरोबा दुधभाते,श्री.लिंबराज काळे,श्री उत्तम सुरवसे गुरुजी,श्री भाऊसाहेब धुमाळ,श्री भाऊसाहेब जाधव,श्री विनायक धुमाळ,श्री नामदेव धुमाळ,श्री खुर्शीद शेख श्री भास्कर कांबळे,श्री गोविंद माधव जाधव ,श्री अतिक मणियार ,श्री संभाजी धुमाळ ,श्री भरत दोडके,श्री.किशोर व्यंकटराव धुमाळ,श्री राहुल ज्ञानोबा पाटील,श्री गोविंद विठ्ठोबा धुमाळ श्री लिंबराज पाटील,श्री ईश्वर धुमाळ,श्री पंडितराव जाधव, प्रा.श्री प्रशांत धुमाळ,श्री.लक्ष्मण बंडगर,श्री सोनेराव क्षीरसागर श्री शिवाजी लोंढड.समीर पठाण श्री शहाजी क्षीरसागर श्री.श्रीकांत कदम,श्री.सचिन धुमाळ श्री.सरदार पठाण,श्री बाळासाहेब गणपत धुमाळ,श्री शाहूराज धुमाळ श्री.किरण जाधव श्री.बंडू मोतीबोने ई.उपस्थित होते,या निवडीनंतर लोकनियुक्त सरपंच व नूतन उपसरपंच व सदस्य यांचा ग्रामस्थांचे वतीने सत्कार करण्यात आला


Post a Comment
0 Comments