निलंगा:-( प्रतिनिधी)
दहावीनंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की कोणत्या क्षेत्रात आपलं करिअर घडवायचं, कोणती शाखा निवडायची, स्वतःचा कल कोणता आहे, कुठल्या क्षेत्रात नोकरीच्या जास्त संधी आहेत. असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेले असतात. अशा सर्व प्रश्नांचे उत्तर विद्यार्थ्यांना मिळावे या दृष्टिकोनातून डीसीपी अकॅडमी द्वारे तालुकास्तरीय करियर गायडन्स सेमिनार डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सांस्कृतिक सभागृह निलंगा येथे दिनांक 29 जानेवारी, रविवार रोजी आयोजित करण्यात आला. निलंगा तालुक्यातील विविध शाळांचे हजाराहून अधिक विद्यार्थी यात स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात प्रा. अमरजीत पाटील सरांच्या गायनाने झाली आणि मा. सतीश हाणेगावे सरांनी शिक्षणातून विद्यार्थी कसा घडतो यावर मार्गदर्शन केले.
डीसीपी अकॅडमी चे संचालक प्रा. विजय गोविंदराव डावरगावे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विज्ञान शाखेचे महत्त्व व त्यामधील असलेल्या वेगवेगळ्या परीक्षां बद्दल माहिती दिली व तसेच प्रा. पुरुषोत्तम डावरगावे सरांनी अभियांत्रिकी शाखे बद्दल माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की केवळ दहावी च्या गुणांवर आपल्या पाल्याचे मूल्यांकन करू नये तर प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये अद्वितीय क्षमता असते आणि त्यानुसारच आपण आपले करिअर निवडावे.
यावेळी तालुक्यातील वेगवेगळ्या वीसहून अधिक शाळेमध्ये घेण्यात आलेल्या डीसीपी स्कॉलरशिप टेस्ट मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप व बक्षीस देखील देण्यात आले.

Post a Comment
0 Comments