.
*औराद शहाजानी (प्रतिनिधी) : शारदोपासक शिक्षण संस्थेद्वारा संचलित महाराष्ट्र विद्यालय प्राथमिक शाळा, औराद शहाजानी येथे आज दि.३० जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मृतिदिन, हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला चंद्रकांत वलांडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात 'साबरमती के संत तुने कर दिया कमाल' या गीताने करण्यात आली. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनाविषयी माहिती देताना ग्रामस्वच्छता, स्वावलंबन, वैयक्तिक स्वच्छतेबरोबर गांधीजींचे विचार दैनंदिन जीवनात उतरवून घ्यावेत, असे प्रतिपादन शाळेतील शिक्षक बालाजी मरळे यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी आणि देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व शहीद जवानांना आज सकाळी ठीक ११ :०० वाजता २ मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 'रघुपती राघव राजाराम' या भजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.*

Post a Comment
0 Comments