लातूरच्या जनतेच्या भावना समजून घेऊन त्यावर तात्काळ कारवाई केल्याबद्दल माननीय आरोग्यमंत्र्यांचे मन:पूर्वक आभार.
लातूर:-
चांगली आरोग्य सेवा ही जनतेची मूलभूत गरज आहे. लातूर जिल्हा व निलंगा मतदारसंघातील आरोग्य विभागाशी संबंधित काही प्रलंबित प्रश्न सोडविण्याकरिता राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री मा.श्री. तानाजी सावंत यांची मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा लोकप्रिय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली. तसेच सोयीं अभावी रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीकडे त्यांचे लक्ष वेधले.
लातूरच्या नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी निवेदन देऊन संबंधित प्रश्नांवर जलदगतीने कारवाई करणात यावी, अशी विनंती निलंगेकरांनी केली. यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून ,संबंधित विभागांना कारवाईचे आदेश दिले आहेत.
निवेदनात समाविष्ट करण्यात आलेले प्रश्न:
लातूर जिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कृषी विभागाची १० एकर जमीन हस्तांतरण प्रस्तावास मंजुरी देणे.
लातूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य ५ केंद्र व २१ उपकेंद्र या रुग्णालयांना मान्यता देणे.
ग्रामीण रुग्णालय, औराद शहाजानी ता. निलंगा येथे अग्निशमन यंत्रणा, जनरेटर व उद्वाहन बसवणे. यासाठी उपकरण खरेदी.
शिरूर अनंतपाळ व औराद शहाजानी याठिकाणी नव्याने मंजूर करण्यात आलेल्या रुग्णालयांकरिता वैद्यकीय यंत्रसामुग्री उपलब्ध करून देणे. तसेच रिक्तपदांची भरती करणे .

Post a Comment
0 Comments