Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*आ.रमेशआप्पा कराड यांची वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर निवड*

*आ. रमेशआप्पा कराड यांची वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर निवड*


          परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून विधान परिषदेचे सदस्य तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांची तीन वर्षाकरिता निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले असून सदरील निवड तीन वर्षाकरिता आहे
           महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम  १९८३ च्या कलम 30 (१) अन्वये महाराष्ट्र विधान परिषदेचे मा सभापती यांनी विधान परिषद सदस्यातून आ रमेशआप्पा कराड यांची परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे सदरील निवड ही तीन वर्षाकरिता आहे याबाबत विधिमंडळाच्या अवर सचिव पुष्पा दळवी यांनी एका पत्राद्वारे आ कराड यांना कळविले आहे.
        या कार्यकारी परिषदेत विविध विभागांच्या तज्ञ लोकांचा समावेश असतो. या परिषदचे कुलगुरू हे पदसिद्ध चेअरमन म्हणून काम पाहातात. विद्यापीठातील शिक्षण, संशोधन व विस्तार यासाठी हि परिषद काम करते. या परिषदेला काही विशेष अधिकार देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विद्यापीठात संशोधन सुरू असते ते अधिक व्हावे यासह विद्यापीठाची जडणघडण चांगल्या प्रकारे व्हावी अशी महत्वाची भूमिका हि समिती पार पाडत असते. 
       विदयापीठाचे काम चांगल्या पद्धतीने चालावे यासाठी शासनाकडे आर्थिक तरतूदीसाठी पाठपुरावाही याव्दारे केला जातो. प्रत्येक महिन्याला या कार्यकारी परिषदेची बैठक होते. या बैठकीत विद्यापीठ कामांचा आढावा घेतला जातो. विविध ठराव या बैठकीत ठेवले जातात मंजूर ठराव शासनाकडे सादर करून मंजुरी संदर्भात पाठपुरावा केला जातो आशा या अत्यंत महत्त्वाच्या कार्यकारी परिषदेवर आ रमेशआप्पा कराड यांची निवड झाल्याबद्दल भाजपाचे विक्रमकाका शिंदे, भागवत सोट, गोविंद नरहरे, हनुमंतबापू नागटिळक, अनिल भिसे, अभिषेक आकनगिरे, डॉ बाबासाहेब घुले, साहेबराव मुळे, सतीश आंबेकर, वसंतराव करमुडे, अँड दशरथ सरवदे, बन्सी भिसे, महिंद्र गोडभरले, चंद्रसेननाना लोंढे, अनंत चव्हाण, पद्माकर चिंचोलकर, सुरज शिंदे, भैरवनाथ पिसाळ श्रीकृष्ण पवार, रमाकांत फुलारी, सिद्धेश्वर मामडगे, मनोज कराड, अनंत कणसे, गोपाळ पाटील, चंद्रकांत कातळे, श्रीकृष्ण जाधव, सुधाकर गवळी, पांडुरंग बालवाड, प्रताप पाटील, अशोक सावंत, राजकिरण साठे, वैभव सापसोड सुधाकर कराड, श्याम वाघमारे, बालाजी दुटाळ, संजय ठाकूर, रशीद पठाण, काशिनाथ ढगे, लक्ष्मण नागीमे, विनायक मगर, लता भोसले ललिता कांबळे, सुरेखा पुरी, अनुसया फड, उषा शिंदे यांच्यासह लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments