तालुक्यातील भिषण चित्र.... एकाच घरातील दोन दोन जणांची नावे
फेरतपासणी करणे गरजेचे.... प्रत्यक्ष गरजवंत बाजूला.... धनदांडगे यादीला.....
लातूर :
प्रधानमंत्री आवास,रमाई आवास योजनेत श्रीमंतांचा भरणा झाला असून अनेक गावांमध्ये ग्रामस्थ चौकशीची मागणी करत आहेत.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ज्यांना राहण्यासाठी निवारा नाही अशा गोरगरीबांना राज्यात घरे दिली जातात. परंतु या योजनेचा गरीबांऐवजी श्रीमंतांनाच अधिक लाभ होताना दिसत आहे. औसा तालुक्यातील कनिष्ठ अभियंता, तांत्रिक अधिकारी आदींनी स्थानिक लोकांना हाताशी धरून त्यांची नावे आवास योजनेच्या यादीत टाकत आहेत. यात गरीबांना डावलण्यात येवून त्यांची नावेच यादीतून गायब करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. अनेकांनी तर पक्की घरे असतानाही पडकी दाखवत छायाचित्र काढून लाभ मिळवला असल्याचे समजते. दरम्यान, औसा तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना यांचा फटका बसला आहे. असे चुकीच्या पद्धतीने घरकुल यादी प्राप्त करणाऱ्या विरुद्ध गटविकास अधिकारी यांनी कारवाई करणे गरजेचे आहे असे बोलले जात आहे.
औसा तालुक्यात प्रधानमंत्री योजनेच्या याद्या आल्या तशा रमाई आवास योजनेच्या पण याद्या आल्या परंतु रमाई आवास मध्ये ज्यांनी दिले पैसे त्यांचेच नाव यादीत आले असल्याचे बोलले जात असून दररोज शेकडो लाभार्थी पंचायत समितीत तक्रार घेऊन येत असून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे ते सांगत आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या याद्या नुकत्याच झालेल्या सभेत ग्रामसेवकांनी वाचून दाखवल्या आहेत. यामध्ये गरजू पात्र लाभार्थी नाहीत. आहेत ती ज्यांच्याकडे शो रुमची कार, शो रुम ट्रॅक्टर, इमारत, बागायत जमीन,मोठ मोठे व्यवसाईक, अशा श्रीमंत लाभार्थीची निवड केलेली आहे. तर काहीच्या घरातील सर्वच व्यक्तींची नावे आहेत. तर कोणी २० वर्षांपासून गावात राहत नाही अशा लाभार्थीचीही नावे आहेत. यामुळे गरीबांची नावे औषधालाही शोधून सापडणार नसल्याची बोलले जात आहे. या यादीमध्ये संबंधीत पंचायत समिती मार्फत नेमण्यात आलेल्या तपासणी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा बदल केल्याचा आरोप तालुक्यातून होत आहे. विशेष म्हणजे, ज्यांनी या अगोदर घरकुलाचा लाभ घेतला आहे त्यांचीही नावे या यादीत घेण्यात आलेली आहे. काही शासकीय कर्मचाऱ्यांच्या नावाचा देखील यामध्ये समावेश असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, खऱ्या लाभार्थ्यांनी वगळण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यात ज्या लोकांना ची यादी प्रत्यक्षात पात्र व अपात्र मध्ये आहेत त्यांच्यापेकी दुसऱ्याच लोकांची नावे यादीमध्ये आली असून हे खुप चुकीचे होत असल्यांचै रुपेश शंके युवा नेते यांनी आमच्या प्रतिनीधी शी बोलताना सांगितले.
*अनेकांनी काढले पडक्या घरांसमोर फोटो*
काहींनी तर प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ज्यांना पक्के सिमेंटची घरे आहेत त्यांनी बाजूला पडक्या घरासमोर उभे राहून फोटो काढले असल्याचे समोर आले आहे. वरील सर्व बोगस लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता व तपासणी अधिकारी यांनी एकाच जागेवर बसून गावातील बोगस लाभार्थाची निवड केली. गरजू व पात्र लाभार्थ्यांची नावे यामधून वगळण्यात येवून त्यांना घरकुलाच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. याची चौकशी करून बोगस झालेला सर्वे तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणीही तालुक्यात सुरू आहे.पण फेरतपासणी करणार कोण.... ज्यांनी दिल्या नोटा त्यांना तेच झाले लाभार्थी मोठा... त्यामुळे या भोगस घरकुल यांदीवर नविन येणारे गटविकास अधिकारी लक्ष घालून नियमाने घरकुल योजना राबविण्यात यशस्वी होतील की शासनाची अपात्र नागरिकांना घरकुल देऊन शासनांची फसवणूक करतील हे पहाणे गरजेचे आहे. रमाई आवास मध्ये कोणत्या गावाला किती घरकुले आली याबद्दल संबंधित विभाग माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे.
*प्रधानमंत्री आवास योजनेचे निकषाला तितांजली*
हे आहेत 13 निकष
मोटारसायकल नसावी, मासेमारी ची यांत्रिकी बोट,चार चाकी वाहन, शेतीची आधुनिक आवजारे, 50हजारांचे किसान क्रेडिट कार्ड, दरमहा 10हजार रुपये उत्पन्न असणारे,टिव्ही, फ्रीज, पंखा, टेलिफोन,1हेक्टर पेक्षा जास्त शेती, दुबार पिक घेणारे शेतकरी,नोकर दार कुटुंबातील व्यक्ती यांना पंतप्रधान आवाज योजना अंतर्गत घरकुल मंजूर करू नये अश्या सुचना असताना याला तिंताजली देत 3-5 हजार रुपये पैसे घेऊन मंजुरी दिली असल्याची जोरदार चर्चा पंचायत समिती परिसरात सुरू असून रमाई आवास मध्यै तर काही मोजक्याच गावांना सर्वात जास्त घरकुले आली असल्याची चर्चा असून संबंधित विभागातील कर्मचारी यांच्यावर कोणाचाही वचक राहिला नसून जो देईल दाम त्यांचेच होईल काम असा फतवा असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment
0 Comments