Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*विशाल दूरदृष्टीचे राजे : छत्रपती शिवराय*


*विशाल दूरदृष्टीचे राजे : छत्रपती शिवराय*

    सोळाव्या शतकामध्ये या महाराष्ट्रातील जनता मोघली आणि निजामी अत्याचाराने गांजून गेलेली होती येथील शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या अन्याय आणि अत्याचाराला सामोरे जावे लागत असे स्त्रियांना घराबाहेर पडणेही अवघड होते एवढेच नव्हे तर या राज्यातील सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्यही नव्हतं अशा परिस्थितीत या महाराष्ट्रात अनेक मातब्बर सरदार होते परंतु ते सर्वजण स्वतःच्याच वतनाच्या तुकड्यांवर समाधानी होते सामान्य माणसांच्या सुखाचे कुणालाही काहीही सोयर सुतक नव्हतं परंतु याच काळात एका माऊलीच्या मनात विचार येत होता की माझ्या महाराष्ट्रातील या सामान्य जनतेला या मोघली  जोखडातून मुक्त करून प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे हा विचार त्यांनी अनेक वेळेला आपल्या पतीशी बोलून दाखवत असे ते पती-पत्नी वारंवार स्वराज्य निर्माण व्हायला पाहिजे सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे यासाठीच तळमळत होते अनेक वेळेला शहाजीराजेंनीही या महाराष्ट्रातील मातब्बर सैनिकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या माध्यमातून ही मोघली सत्ता  उलथून टाकण्याचाही प्रयत्न केला परंतु अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात त्यांना यश मिळवता आलेले नाही जे स्वप्न आपण स्वतः साकार करू शकलो नाही ते अपूर्ण राहिलेले स्वप्न आपण स्वतःच्या मुलाच्या माध्यमातून साकार करायचंच हा संकल्प शहाजीराजेनी  केला आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने स्वराज्याचे संकल्पक म्हणून आज आपण शहाजीराजांकडे पाहतो स्वराज्य संकल्पना ही त्यांनी निर्माण केली आणि ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी प्रत्यक्ष राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनी जे काही कठोर परिश्रम घेतले जी मेहनत घेतली त्या मेहनतीला आणि कठोर परिश्रमाला जगाच्या इतिहासात तोड नाही या मातेच्या प्रबळ इच्छा शक्तीमुळे संस्कारामुळे योग्य मार्गदर्शनामुळे आणि मनातील प्रचंड इच्छाशक्तीमुळे छत्रपती  शिवरायांवरती अगदी पोटात असताना पासूनच तशा पद्धतीचे संस्कार जिजाऊंनी केले आणि त्या संस्काराचा परिणाम 19 फेब्रुवारी 1630 ला एका मोघली साम्राज्याच्या कर्दनकाळाने अर्थात छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला जन्मानंतरही शिवाजीराजांवरती महापुरुषांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगून योग्य पद्धतीने न्यायनिवाडा कसा करायचा प्रशासन कशा पद्धतीने चालवायचं राज्यकारभार कसा चालवावा सामान्य माणसाला न्याय कशा पद्धतीने मिळवून द्यावा स्त्रियांकडे पाहण्याचा विशाल दृष्टिकोन कसा ठेवावा शेतकऱ्यांचे हित कसं जोपासावं अशी कितीतरी संस्कार राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवाजीराजांवरती केले आणि याच संस्काराचा ठेवा जोपासण्याचं काम शिवरायांनी भविष्यामध्ये आयुष्यभर केलेले पाहायला मिळते वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेऊन आठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन त्यांचा विश्वास मिळवला आणि तो कायम टिकवला प्रत्येक मावळ्याला खात्री होती की माझ्या नंतर माझ्या कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी घेणारा माझा राजा आहे हा विश्वास प्रत्येक मावळ्यांच्या मनात निर्माण करण्याचं काम शिवरायांनी केलं आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो विश्वास त्यांनी जोपासलेला होता छत्रपती शिवरायांचा इतिहास हा फक्त लढयांपुरता मर्यादित असणारा इतिहास नव्हता लढायांच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवरायांची विशाल दूरदृष्टी अभ्यासणे ही खऱ्या अर्थाने आजच्या काळाची गरज आहे कारण छत्रपती शिवरायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकही काम हे विना नियोजनाचे केलेलं नव्हतं प्रत्येक कामाचं पूर्व नियोजन करणे आणि त्या नियोजनाप्रमाणे काम घडवून आणणं हे शिवरायांचे आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाची आणि जमेची बाजू होती आणि त्यामुळे त्यांनी ज्या ज्या वेळेला स्वराज्यावर संकट आली त्या त्या वेळेला त्या संकटांचा सामना करण्यासाठी योग्य प्रकारचंं प्लॅनिंग आखलं नियोजन आखलं आणि त्या नियोजनाप्रमाणे अत्यंत समर्थपणे हिमतीने मोठ्या ताकतीने आणि स्वतःवरती प्रचंड मोठा विश्वास ठेवत योग्य पद्धतीने मात करूनही दाखवली प्रत्येक संकटावर त्यांनी विजय मिळवला त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे शिवरायांचे योग्य नियोजन जगाच्या पाठीवर अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यवस्थापनाचं कौशल्य राजाला जमलेलं होतं तो एकमेव अद्वीतीय राजा म्हणजे छत्रपती शिवराय होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे पाहत असताना केवळ लढायांचा इतिहास म्हणून आपण याकडे न पाहता छत्रपती शिवराय हे त्या काळामध्येही ज्या काळात विज्ञान सायन्स एवढे प्रगतशील नव्हतं त्याही काळामध्ये सायन्सला आश्चर्य वाटावं किंवा सायन्सलाही त्यांच्यावरती संशोधन करण्याची गरज वाटावी अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजीचा वापर हा शिवरायांनी केलेला आपल्याला दिसून येतो त्या काळामध्ये संदेशवहनाचे प्रभावी साधन आजच्यासारखे अस्तित्वात नसलं तरीही त्यांनी संदेशवहनासाठी ध्वनी प्रकाश आणि अग्नी यांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर केलेला दिसून येतो ज्या ज्या वेळेला स्वराज्यामध्ये सामान्य लोकांच्या मनामध्ये गोंधळाची अवस्था निर्माण होईल  अवस्था  त्या त्या वेळेला प्रत्येक माणसाला मोठा धीर देण्याचं काम शिवरायांनी केलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हीच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्याची पावती होती कारण ज्या काळात प्रत्येक राजा हा कित्येक स्त्रिया ठेवू शकत होते एवढेच नव्हे तर लढाईवर जात असताना ज्या प्रांतात जातील त्या प्रांतातील  स्त्रिया उपभोगणे ही त्या काळची रीत होती परंतु जगाच्या पाठीवर एकमेव राजा होता ज्या राजाने आपल्या सर्व सैन्यांना ताकीद दिली होती की लहान लेकरांना आणि स्त्रियांना कुठलीही तोषीश होता कामा नये म्हणजेच स्त्रियांच्या बाबतीमध्ये अत्यंत जागृक असणारा हा राजा त्यामुळेच शत्रूंच्या स्त्रियांनाही छत्रपती शिवाजी राजांच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांबद्दल आदर होता म्हणून स्त्रियांच्या विषयी अत्यंत   उदार आणि व्यापक दृष्टिकोन असणाऱ्या या राजाने आपल्या स्वतःच्या एका सुनेला म्हणजेच येशू बाईला 17 व्या वर्षी स्वराज्याची कुलमुखत्यार म्हणून सही शिक्याचा अधिकार बहाल केला आणि तारा राणीला स्वतः लढाईचे  प्रशिक्षण देऊन युद्धामध्ये पारंगत केले यावरून छत्रपती शिवाजी राजांचा स्त्रीविषयी असणारा व्यापक दृष्टिकोन आपल्या लक्षात येतो शेतकरी हा खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंद आहे आणि हा पोशिंदा सुखी समाधानी आनंदी राहिला तरच जगातील सगळ्या लोकांचे तो चांगल्या पद्धतीने पोट भरू शकतो ही खात्री शिवरायांना असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत विशाल दृष्टिकोन ठेवत प्रत्येक शेतकऱ्याला अडी अडचणीच्या काळामध्ये बिगर व्याजी कर्ज उपलब्ध करून देणं त्याच्यासाठी शेतीसाठी लागणारे हत्यार अवजार उपलब्ध करून देणं बैल जोडी उपलब्ध करून देणं अशा कितीतरी कामे छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी केलेली होती म्हणून छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभारामध्ये एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आपल्याला इतिहासामध्ये सापडत नाही म्हणजेच शेतकऱ्यांच्या विकासासाठी विशाल दृष्टिकोन बाळगणारा जगातला पहिला राजा म्हणून छत्रपती शिवरायांकडे पाहिलं जातं एवढेच नव्हे तर समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूंपासून या महाराष्ट्राचं संरक्षण झालं पाहिजे भविष्यात इंग्रज डच पोर्तुगीज यांच्यासारखे शत्रू हे समुद्रमार्गे महाराष्ट्रात येऊ शकतात आणि महाराष्ट्राला पुन्हा त्रास देऊ शकतात हा भविष्यातील धोका लक्षात घेऊन त्या काळात छत्रपती शिवरायांनी आरमार दलाची उभारणी केली समुद्रामध्ये विविध किल्ल्यांची उभारणी केली जेणेकरून परकीय शत्रूंवरती नजर ठेवता येईल आणि परकीय शत्रूला बाहेरच रोखता येईल इतक्या मोठ्या विशालदृष्टीचा राजा हा इतिहासात पुन्हा होणे नाही आणि यापूर्वी झाला नाही असं म्हटलं तर निश्चितच वावगं ठरू नये छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा दूरदृष्टीकोन म्हणजे या राजाने आपल्या दहा वर्षाच्या मुलाला आग्रा भेटीच्या वेळी स्वराज्यापासून शेकडो मैल दूर आग्र्याला घेऊन गेले शत्रूच्या ताब्यात आपण अडकलो तर आपण स्वतःही जाऊ आणि आपल्या मुलाचेही काय होईल याची पूर्णतः खात्री असतानाही शत्रूच्या प्रदेशात दहा वर्षाच्या मुलाला नेण्याचा म्हणजे संभाजी राजांना घेऊन जाण्याच्या पाठीमागचा दूरदृष्टीकोन जर आपण लक्षात घेतला तर या राजाच्या विशाल दृष्टिकोनाचा प्रचिती आपल्याला येते कारण दहा वर्षाचा असताना जर संभाजी राजांना शत्रूचा प्रदेश पाहायला मिळाला तिथली प्रशासन व्यवस्था पहायला मिळाली तिथली राज्यकारभार करण्याची पद्धत पाहायला मिळाली ती  त्या ठिकाणच्या संपूर्ण गोष्टींची इतंबूत माहिती आणि अभ्यास जर छत्रपती संभाजी राजांना करता आला तर भविष्यात आपल्या मुलाला ही पादशाही उलटून टाकण्यासाठी किती कष्ट करावे लागणार आहेत किती मेहनत घ्यावी लागणार आहे किती मोठ्या प्रमाणात ताकद बाळगावी लागणार आहे वाढवावी लागणार आहे याचा अंदाज येईल आणि त्या दृष्टिकोनातून भविष्यातील छत्रपती संभाजी राजे हे अत्यंत सक्षम भक्कम आणि परिपूर्णरित्या तयार होतील यासाठी म्हणून छत्रपती संभाजी राजांना शिवराय आग्र्याला घेऊन गेले होते यावरून छत्रपती शिवरायांना आपल्या स्वराज्याविषयीची असणारी तळमळ आणि जगातील एक आदर्श राज्य म्हणजे स्वराज्य ही ओळख निर्माण झाली पाहिजे आणि ही ओळख टिकवण्याचं काम संभाजीराजांच्या माध्यमातून झालं पाहिजे हा विचार शिवरायांचा होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आम्ही काय शिकले पाहिजे आज छत्रपती शिवरायांनी ज्या ज्या समाज उपयोगी गोष्टी केल्या त्या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे निसर्गाचा समतोल राखला जावा यासाठी स्वतंत्र आज्ञापत्र काढून वृक्षतोडीवर बंदी घालणारा जगाच्या पाठीवरचा साडेचारशे वर्षांपूर्वीचा पहिला राजा जर कोण असेल तर ते छत्रपती शिवराय होते आजही आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड करत आहोत एकीकडे सिमेंटची जंगले उभी करत आहोत आणि निसर्गातील जंगले नष्ट करत आहोत खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांना आपण समजून घेतले आहे का किंवा स्वीकारले आहे का याचे आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करणे ही आजची आपली गरज बनलेली आहे छत्रपती शिवरायांना जगातील अनेक राष्ट्रांनी स्वीकारलं नुसतं स्वीकारलं नाही तर आत्मसात केलं आज व्हियतनाम सारखा एखादं  चिमूटभर राष्ट्र अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाबरोबर लढाई करतो आणि नुसती लढाई करत नाही तर लढाई जिंकतो आणि जिंकल्यानंतर त्या ठिकाणच्या राष्ट्राध्यक्षांना जेंव्हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही एवढ्या मोठ्या अमेरिकेला कसं काय हरवू शकलात त्यावेळेला व्हियतनामचा राष्ट्राध्यक्ष व्हि.ची.मिन्ह म्हणतात आम्ही अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला हरवू शकलो कारण आमच्या समोर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास होता आणि तोच इतिहास आमच्या सैनिकांनी डोळ्यासमोर ठेवला आणि मोठ्या ताकतीने हिमतीने आणि आत्मविश्वासाने लढले आणि यशस्वीही झाले जगाच्या अनेक राष्ट्रांमध्ये आजही छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून प्रेरणा घेतली जाते आणि त्या दृष्टीने आपणही प्रयत्न केले पाहिजे अशा प्रकारचा विचार जगातल्या विविध राष्ट्रांमध्ये केला जातो पण आम्ही मात्र तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी अशा युक्ती प्रमाणे आपल्याजवळ सगळं काही असताना एवढा मोठा छत्रपती शिवरायांच्या कार्याचा विचाराचा संस्काराचा वारसा असतानाआम्ही मात्र दिशाहीन झालो आहोत आणि छत्रपती शिवरायांचा विचार स्वीकारण्याऐवजी 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या माध्यमातून रस्त्यावरती उतरणे ढोल ताशे नगारे वाजवणे छत्रपती शिवाजी राजांच्या नावाने जय जयकार करणे आणि छत्रपती शिवरायांना पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून विसरून जाणे हा शुद्ध वेडेपणा आम्ही करतो आहोत म्हणून खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करत असताना छत्रपती शिवरायांना जर आपल्या डोक्यावर घेऊन मिरवायची हौस असेल तर निश्चितपणे डोक्यावर घेऊन मिरवा परंतु त्याहीपूर्वी छत्रपती शिवरायांना आपण प्रत्येकाने डोक्यात घालण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक गुणांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करावा आणि शिवरायांना स्वतःमध्ये रुजवून घेण्याचा प्रयत्न करावा आज विविध क्षेत्रांमध्ये छत्रपती शिवराय निर्माण व्हावे अशी आपली सर्वांची इच्छा असेल आपल्या घरात छत्रपती शिवराय निर्माण व्हावेत अशी इच्छा असेल तर शिवरायांच्या गुणांचा अंगीकार आणि स्वीकार आपल्याला स्वतःला करावा लागेल त्यासाठी शिवराय हे विविध अंगाने समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला शिवरायांकडे पहावे लागेल शिवरायांच्या इतिहासाकडे त्त्या दृष्टीने पहावं लागेल आणि मगच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या विचाराचा आणि त्यांच्या कार्याचा परिणाम हा आपल्या वागण्यातून बोलण्यातून आणि वर्तनातून दिसून यायला लागेल आणि स्वतःच्या कुटुंबाचा विकास करताना स्वतःच्या कुटुंबातही शिवाजी राजे निर्माण करण्याचं स्वप्न आपण सत्यात उतरू शकतो यासाठी खऱ्या अर्थाने शिवराय समजून घेणे ही आमच्या सर्वांसाठी अत्यंत गरजेची गोष्ट आहे म्हणूनच सर्वांनी एकच लक्षात ठेवलं पाहिजे की,
जीवन को शत शत आहुती मे जालना होगा गलना होगा अगर इस देश की उन्नती के लिए छत्रपती शिवाजीराजे की विचारोंपे चलना होगा.
        संभाजी नवघरे
मु.अ.विश्वकर्मा प्रा.वि.लातूर
बहिशःल वक्ता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड

Post a Comment

0 Comments