महाराष्ट्र महाविद्यालय,निलंगा भाषा वाड्.मय मंडळाच्या वतीने मादीमं महाविद्यालय, औराद शहाजानी येथील प्रा.डाॅ.अशोक नारनवरे यांचे नुकतेच व्याख्यान झाले .या व्याख्यानात विश्व साहित्यातील मानवी जीवनावर प्रभाव टाकून ,जीवन समृद्ध करणा-या जगातील महत्त्वपूर्ण ग्रंथाचा धांडोळा प्रा. नारनवरे यांनी मांडला.
बर्ट्रांड रसेल यांची "मॅरेज अॅण्ड माॅरैल "प्रोब्लेम ऑफ फिलॉसॉफी ",अल्बर्ट कामूचे "आऊटसायडर ",मॅक्झीम गाॅर्कीची"आई",लीयो टाॅलस्टाय चे "वाॅर अॅण्ड पीस "सिमोन द बोव्हा चे "द सेकंड सेक्स "शेक्सपियर "हॅम्लेट",स्टोवची "अंकल टाम केबिन "कार्ल मार्क्स चे "दास कॅपिटल इ.असंख्य ग्रंथानी मानवी जीवनाची दिशा बदलली.असे ते म्हणाले.
थाॅमस पेनच्या "aag of nation",human rights " comman sens इ.ग्रंथांनी महात्मा जोतीराव फुले यांना सामाजिक क्रांतीची प्रेरणा मिळाली. त्यांनी गुलामगिरी,शेतकऱ्याचा आसूड ग्रंथातून.मानवी हक्कांपासून वंचित असलेल्या समाजाला क्रांतीची प्रेरणा दिली व वंचिताचे जीवन उन्नत केले.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे अॅनिहीलेशन ऑफ कास्ट,बुद्ध आणि त्याचा धम्म,भारतीय संविधान हे भारतीय मानवी जीवन व्यापून टाकणारे चिंतनशील ग्रंथ आहेत .अशी विस्तृत मांडणी नारनवरे यांनी केली.
भाषा मंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डाॅ.कोलपुके यांनी करून समयोचित विचार मांडले.डाॅ.हंसराज भोसले यांनी प्रास्ताविक केले;डाॅ.बालाजी गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषण केले.
यावेळेस एका मराठीचा विद्यार्थ्यांने नवनाथ गोरे यांच्या "फेसाटी"या पुस्तकावरील अभ्यासपूर्ण परीक्षण वाचले.ह्या सुंदर परीक्षणसाठी प्रा.नारनवरे यांनी विद्यार्थ्याचे "पुस्तकनाद" हे पुस्तक देऊन अभिनंदन केले.या कार्यक्रमास"डाॅ. अजितमुळजकर,डाॅ.भास्कर गायकवाड, डाॅ.शिवशेट्टे,डाॅ.ज्ञानेश्वर चौधरी,डाॅ.चौधरी मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments