औरंगाबाद प्रतिनिधी:-
औरंगाबाद जिल्ह्यात लाच लुचपत विभागाने केलेल्या एका मोठी कारवाईने खळबळ उडाली आहे. जलसंधारण विभागातील एकाअधिकाऱ्याला साडेआठ लाखांची लाच घेताना एसीबीने अटक केलीआहे.औरंगाबाद जिल्ह्यातील एसीबीची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे. ऋषिकेश देशमुख (उपविभागीय अधिकारी वैजापूर जलसंधारण विभाग) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव असल्याचं समोर आलं आहे.एसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऋषिकेश देशमुख हे जलसंधारण विभागात वैजापूर येथील उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. दरम्यान जलसंधारण विभागातील एका कामाची टक्केवारी म्हणून, त्यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितली होती. मात्र तक्रारदार यांची लाच घेण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. दरम्यान एसीबीने लावलेल्या ट्रॅपनुसार, देशमुख यांना साडेआठ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. एसीबीच्या या कारवाईने जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे.

Post a Comment
0 Comments