Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*रविवारी बुध्द विहारात बुध्द वंदना अभियानास तक्षशिला बुध्द विहारातून प्रारंभ*

*रविवारी बुध्द विहारात बुध्द वंदना अभियानास तक्षशिला बुध्द विहारातून प्रारंभ*

*भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या मंगल वाणीने धम्मप्रवचन संपन्न*

लातूर :-

लातूर शहरातील प्रत्येक नगरातील असलेल्या बुध्द विहारांमध्ये भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली दर रविवारी भेट देवुन बुध्द विहारात बुध्द वंदना चालु करणेविहार स्वच्छता आणि धार्मिक व नैतिक संस्कार समाजातील जनमाणसावर रुजविण्यासाठी विशेषतः तरुण युवा वर्गास धम्माकडे प्रेरित करुन समाजातील प्रत्येक जन संस्कारीत होण्यासाठी विशेषत: बालक वर्गात धम्म संस्कार रुजवणे यासंबंधी विहारात बुध्द वंदना, धम्म प्रवचन व संस्कारपर कार्यक्रम येणाऱ्या वर्षभरात आयोजित केल्या जाणार आहेत.


यावेळी धम्म देसना देताना पू. भिक्खू पय्यानंद थेरो म्हणाले कीशहरातील प्रत्येक नगरातील बौद्ध समाजाने बुध्द विहाराचे महत्व जाणून बुध्द विहाराची निर्मिती करणे काळाची गरज आहे. भारतातून बौद्ध वृक्ष सुकला असेल तरी त्याचे मूळ अजून सुकले नाही त्याला जर खत-पाणी घातले तर पुनः नव्याने पालवी फुटेल. त्याच अनुषंगाने बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व बौद्ध धम्माचा वृक्ष ह्या भारताच्या मूळ भूमीत पुन्हा उभा केला. हजारो वर्षे अस्पृश्यांचे जीवन जगणाऱ्या दिन दुबळ्यांना अशा विषमतावादी धर्मातून काढून समता, स्वातंत्र बंधुत्व व न्यायावर आधारित बौद्ध धम्मात आणले व सर्व समाज्याच्या बरोबरीने बसविल. समतावादी बौद्ध धम्माला जर येथून पुढे टिकवायचे असेल तर आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे त्याने बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार घरोघरी केला पाहिजे असेही ते म्हणाले.

यावेळी त्रिशरण पंचशील, त्रीरत्न वंदना, २२ प्रतिज्ञा व संविधान प्रास्ताविकेचे सामुहीक वाचन, धम्मदेशना आदी कार्यक्रम संपन्न झाले. तसेच यावेळी प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे यांचेही मार्गदर्शन संपन्न झाले. धम्मपालन गाथा, आशीर्वाद आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इंजि.सचिन गायकवाड यांनी केले तर आभार सचिन मंडाले यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अक्षय धावारे, अविनाश आदमानेअसलम शेख, अविनाश डुमने, ओंकार घनघावकरनिलेश बनसोडे, विशाल वाव्हुळे, सतिश कांबळे, समाधान आचार्य, सतीश मस्केउदय सोनवणेअनिरुद्ध बनसोडेमिलिंद धावारे आंदीनी प्रयत्न केले. यावेळी राहुल नगर परिसर व लातुर शहर परीसरातील उपासक-उपासिका आणि बौध्द जन मोठया संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments