Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*झाडांवर तिचं नाव कोरण्यापेक्षा'ती' च्या नावाने झाड लावून संवर्धन करा*

झाडांवर तिचं नाव कोरण्यापेक्षा
'ती' च्या नावाने झाड लावून संवर्धन करा

'व्हॅलेंटाइन डे' निमित्ताने 'वसुंधरा' प्रतिष्ठानचे आवाहन

लातूर : आपल्या प्रियसीचे नावं झाडांवर कोरण्याची जणू काही सध्या स्पर्धाच लागलेली दिसते आहे. झाडांवर स्वतःच आणि प्रियसीच नावं कोरण्यासाठी चावी अथवा अन्य साधनांचा वापर केला जातो. यामुळे झाडांना मोठ्या प्रमाणावर इजा होते. कारण झाडंही तुमच्या आमच्यासारखी सजीवच आहेत. तिचे नाव झाडांवर कोरण्यापेक्षा तिच्या नावाने झाडं लावून त्या झाडाचे संवर्धन करावे, असे आवाहन वसुंधरा प्रतिष्ठानने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
आपल्या प्रियसीचे नाव झाडांवर कोरून स्वतःसह तिच्या नावाचे पहिले अक्षर लिहले जाते आहे. हा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. झाडांवर प्रियसीचे नावं कोरण्यासाठी गाडीच्या चावीचा अथवा कटरचा वापर केला जातो. यामुळे झाडांना मोठ्या प्रमाणावर इजा होते आहे. यामुळे झाडांची वाढ खुंटते. झाडेही सजीव असतात त्यांनाही त्रास होतो यामुळे झाडांवर प्रियसीचे नाव टाकण्यापेक्षा तिच्या नावाने झाड लावून त्या झाडाचे संवर्धन करावे, असे आवाहन वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, जिल्हाध्यक्ष उमाकांत मुंडलिक, कार्याध्यक्ष अमोल आप्पा स्वामी, कार्यकारिणी सदस्य शिवाजी निरमनाळे आदींनी केले आहे.

*झाडांसोबत साजरा होणार व्हॅलेंटाईन डे*
*************************
हृदयाशिवाय माणूस जगूच शकत नाही. माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजन झाडे मोफत पुरवतात. मात्र, झाडांची खुलेआम कत्तल केली जाते, ही दुर्दैवी बाब आहे. झाड आणि मानव यांच्यातील नाते आणखी दृढ व्हावे यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानकडून प्रत्येक सण-उत्सव झाडांसोबत साजरा केला जातो. येत्या 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डे झाडांसोबत साजरा केला जाणार असून, माणसाला वाचायचे असेल तर निसर्गाला जपायला हवे असे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून केले जाणार आहे.

Post a Comment

0 Comments