खा. श्रृंगारे यांच्या मार्फत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना लातूर येथे एस पी आय (सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्था) स्थापन करण्याची मागणी
लातूर:-
लातूर लोकसभा मतदार संघाचे खा सुधाकर श्रृंगारे यांची आम्ही लातूरकर युवक कृती समितीच्या वतीने शिष्ट मंडळाद्वारे भेट घेत लातूर येथे एस पी आय (सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्था) स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भारतीय संरक्षण सेवेमध्ये महाराष्ट्रातील युवकांना जास्तीत जास्त संख्येने संधी मिळावी व मोठा अधिकारी वर्ग निर्माण होण्यासाठी औंरगाबाद येथे सैनिक सेवा पूर्व शिक्षण संस्था (एस पी आय ) ची स्थापना शासनाने केलेली आहे.
त्याच धर्तीवर लातूर येथे एस पी आय (सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्था) स्थापना केल्यास एन डी ए, आय एन ए, सी डी एस, आय एम ए, ओ टी ए, आदी संरक्षण दलाच्या वेगवेगळ्या विभागात सैन्य अधिकारी म्हणुन कार्यरत/रूजू होण्यासाठीची संधी लातूर जिल्हयातील व लगतच्या परिसरातील जास्तीत जास्त युवक, विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्यामुळे लातूर येथे (एस पी आय)सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्था) स्थापन करण्याची मागणी खा सुधाकर श्रृंगारे यांच्या मार्फत देशाचे गृहमंत्री राजनाथसिंह यांना केली आहे.
निवेदनावर अँड प्रदिपसिंह गंगणे, अँड विजय अवचारे, बालाजी पिंपळे, ताहेरभाई सौदागर, अँड शिवराज लखादिवे, रामलिंग बिडवे, जमाल्लोद्दीन मणियार, अँड रवि मोहिते, दिगबर कांबळे, अँड सुहास बेंद्रे, संतोष मस्के आदींच्या स्वाक्षऱ्या असून यांची प्रत देशाचे संरक्षणमंत्री ना राजनाथसिंह,राज्याचे मुख्यमंत्री मा ना एकनाथ शिंदे यांना ही पाठविण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments