विभागीय कार्याध्यक्षपदी लातूर जिल्हा सचिव ब्रिजलाल कदम तर विभागीय प्रसिद्धी प्रमुख पदी शिवाजी निरमनाळे यांची नियुक्ती करण्यात आली.
लातूर:-( प्रतिनिधी)
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेची मराठवाडा विभागीय बैठक रविवार दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रविवार रोजी लातूर येथील सुदर्शन विद्यालयात परिषदेच्या अध्यक्षा डा.निर्मलाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीसाठी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष इंजि.लिंबराजबप्पा सुर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय सचिव शिवमती वनिताताई काळे,साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डा.प्रकाश काळे,प्रदेश महासचिव बालाजी जाधव, प्रदेश संघटक सतिश हानेगावे,गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संभाजी नवघरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी जिजाऊ प्रतिमा पूजन व सामूहिक जिजाऊ वंदना घेऊन बैठकीस प्रारंभ करण्यात आला.लातूर शाखेच्या वतीने प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले.
बैठकीच्या प्रास्ताविकात प्रदेश महासचिव बालाजी जाधव यांनी कार्य अहवाल सादर करुन बैठक आयोजना मागील भूमिका सविस्तर विशद केली.साहित्य परिषदेच्या कार्य विस्तारासाठी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून कार्यरत व्हावे असे आवाहन केले.
इंजि.लिंबराजबप्पा सुर्यवंशी यांनी परिषदेच्या वाटचालीचे कौतुक केले.तुकोबावाणी सातत्याने प्रकाशित होत आहे याबद्दल समाधान व्यक्त करुन सर्वतोपरी सहकार्य करण्याची भावना बोलून दाखविली.
प्रदेश कार्याध्यक्ष प्रकाश काळे यांनी साहित्य परिषदेच्या प्रारंभीच्या काळातील वाटचालीची माहिती देऊन आलेल्या प्रत्येक समस्यांवर मात करत कार्यविस्तार कसा केला याचे अनुभव सांगितले.वयाची ऐंशी वर्षे उलटली असतानाही यवतमाळ ते लातूर प्रवास करुन ते बैठकीसाठी उपस्थित होते.साहित्य परिषदेच्या कार्याप्रती असलेली त्यांची निष्ठा,तळमळ आणि उत्साह पाहून सर्व पदाधिकारी प्रभावित झाले.
प्रदेशाध्यक्षा निर्मलाताई पाटील यांनी मौलिक सूचना केल्या.ग्राम शाखेच्या माध्यमातून साहित्य परिषदेचे कार्य ग्रामीण भागात पोहचविणे कसे सुलभ आहे ते सोदाहरण सांगितले. छोट्या छोट्या अनेक उपक्रमांचे आयोजन करुन कार्य करण्याचे आवाहन केले.आगामी साहित्य संमेलन आयोजनाबद्दल मार्गदर्शन केले.परस्पर संपर्क पदाधिकाऱ्यांनी नियमित ठेवावा अशी सूचना केली.इतिहासाची पुनर्मांडणी आणि शालेय अभ्यासक्रम निर्मितीचे प्रकल्प हाती घेण्याची निकड सांगितली.लवकरच पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा राज्य शाखा घेण्याच्या विचारात असल्याची माहिती दिली.
वनिताताई काळे यांनी साहित्य परिषद विस्तारात येणारे संभाव्य धोके कोणते आणि त्यावर कशी मात करता येईल याबाबत मौलिक मार्गदर्शन केले.
विभागीय बैठकीच्या चर्चेत बीड जिल्हाध्यक्ष विश्वंभरराव वराट,लातूर जिल्हाध्यक्ष विवेक सौताडेकर,सतिश हानेगावे,मोहन माकणे,राजेंद्र रोळे,संभाजी नवघरे यांनी विचार मांडले आणि काही विधायक सूचना केल्या.
या बैठकीत लातूर जिल्हा सचिव ब्रिजलाल कदम यांची नियुक्ती विभागीय कार्याध्यक्ष म्हणून व शिवाजी निरमनाळे यांची नियुक्ती विभागीय प्रसिद्धी प्रमुख म्हणून करण्यात आली.
फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध होणाऱ्या तुकोबावाणी अंकाचे प्रकाशन या बैठकीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
बैठकीचे सूत्रसंचालन लातूर तालुकाध्यक्ष डा. दिनेश भिसे यांनी केले.

Post a Comment
0 Comments