Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी: प्रा. मिरगाळे*


*रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी: प्रा. मिरगाळे*

निलंगा:  पंधराव्या वित्त आयोगातून मौजे. नणंद,ता. निलंगा, जि. लातूर येथे सिमेंट रस्त्याचे निकृष्ट काम होत आहे अशा आशयाचे निवेदन युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे. 
      मौजे. नणंद येथे सिमेंट रस्त्याचे पंधराव्या वित्त आयोगातून काम सुरू आहे. दगड खडी ऐवजी मातीवरच काँक्रीट टाकून काम चालू आहे. चार इंच काँक्रीट माल टाकण्याऐवजी एक इंच माल टाकून थातूरमातूर काम करण्यात येत आहे , अशा निकृष्ट  कामाची तात्काळ चौकशी करावी व संबंधितावर योग्य ती कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहे.

Post a Comment

0 Comments