*महाराष्ट्र विद्यालय सेवकांची पतसंस्थेच्या चेअरमनपदी किशोर गुंड तर व्हा चेअरमनपदी बिराजदार एस एम यांची निवड*
औराद शहाजानी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विद्यालय वेतनोपार्जक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित औराद शहाजानी पतसंस्थेची सन २०२२ ते २०२७ या वर्षाकरिता निवडणूक पार पडली. श्री किशोर गुंड यांची चेअरमनपदी, श्रीमती एस एम बिराजदार यांची व्हा.चेअरमनपदी तर श्री बालाजी मरळे यांची सचिवपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवड कार्यक्रम हेडाभवन या ठिकाणी पार पडला. पतसंस्थेचे संचालक पुढीलप्रमाणे - वलांडे शंकर, सावरे दिगंबर, थेटे रमेश, मरगणे प्रमोद, आळंदकर मोईन, चौधरी जाफर, वानखेडे द्वारका, शिंदे मंगेश, ओहळ विशाल.
चेअरमनपदी निवड केल्याबद्दल शारदोपासक शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र विद्यालय प्राथमिक शाळा, महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय या युनिटचे आभार श्री किशोर गुंड यांनी मानले. यावेळी पतसंस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. मागील कार्यकाळात जसे पतसंस्थेचे पारदर्शक काम करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले तसेच पुढील कार्यकाळात सहकार्य करण्याची विनंती केली व आपणही पतसंस्थेचा कार्यभार पारदर्शक करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

Post a Comment
0 Comments