*महाराष्ट्र प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश*
औराद शहाजानी (प्रतिनिधी)
: येथील महाराष्ट्र विद्यालय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ज्युनिअर आयएएस - २०२३ या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले. एकूण आठ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले. यामध्ये नंदे धीरज सोमनाथ इयत्ता चौथी, नाईकवाडे जैद रियाजुद्दीन इयत्ता चौथी, बुरनापल्ले प्राची दगडू इयत्ता चौथी, बागवान निखत गफार इयत्ता चौथी, भंडारे साधना नरसिंग इयत्ता चौथी, बिरादार तृप्ती रवी इयत्ता चौथी, मेघना लकशेट्टे इयत्ता तिसरी, आरुषी सोमनाथ नंदे इयत्ता दुसरी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शारदोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बस्वराज वलांडे, उपाध्यक्ष प्रेमचंद बियाणी, सचिव रमेश बगदुरे, सहसचिव राजेश वलांडे, मुख्याध्यापक महेबूब लष्करे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments