*अभिमानाने बोलेल प्रत्येक लातूरकर
होय मी सावरकर मी सावरकर*
*भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या उपस्थितीत लातूर येथे बैठक संपन्न*...
लातूर:-(प्रतिनिधी)
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे क्रांतीचे यज्ञकुंड. भारत मातेच्या या तेजस्वी पुत्राच्या सन्मानाप्रित्यार्थ लातूर शहर जिल्हा अंतर्गत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येणार आहे. यानिमित्ताने आज लातूर शहर जिल्ह्याची आढावा बैठक घेऊन यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेतला.
स्वातंत्र्यवीर सावरकार यांचे कार्य फार मोठे असून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले आहे. मात्र सावरकरांबाबत कॉंग्रेस पक्षाकडून वारंवारपणे अवमानकारक शब्द वापरून त्यांना टीकेचे लक्ष्य केले जात आहे. त्यासाठी सावरकरांच्या कार्याचा गौरव वाढविण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या कार्याची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात होणारी गौरव यात्रा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन यात्रेचा लातूर पॅटर्न तयार करावा, असे आवाहन या बैठकी वेळी केले. तसेच या यात्रेच्या माध्यमातून वातावरण निर्मिती व शक्ती प्रदर्शनातून नागरिकांच्या मनात हिंदुत्वाची भावना अधिक प्रमाणात जागृत व्हावी, यासाठी देखील प्रयत्न करण्यात यावेत, अशी अपेक्षा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली.
या बैठकीला लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथजी मगे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शैलेशजी लाहोटी, ॲड. दिग्विजय काथवटेजी, शिरीषजी कुलकर्णी, माजी स्थायी समिती सभापती ॲड. शैलेशजी गोजमगुंडे, माजी उपमहापौर देविदासजी काळे, प्रदेश प्रवक्त्या प्रेरणाताई होनराव, महिलाध्यक्षा मीनाताई भोसले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते बंधू उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments