Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*११ वे 'बळीराजा साहित्य' संमेलनानिमित्त विनम्र आवाहन!*


११ वे 'बळीराजा साहित्य' संमेलन विनम्र आवाहन!...


 जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र व शब्द पंढरी प्रतिष्ठान, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने उजेड ता. शिरूर (अनंतपाळ)  जि.लातूर येथे ११ वे 'बळीराजा' साहित्य संमेलन दि. ०९ एप्रिल २०२३ रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने हृदयपूर्वक विनम्र आवाहन!...
 
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीने  साहित्य संमेलनाच्या पूर्व संध्येला शिवमती डॉ. निर्मलाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व शिवश्री डॉ. प्रकाश काळे( प्रदेश कार्याध्यक्ष ) शिवश्री बालाजी जाधव( प्रदेश महासचिव ) यांच्या उपस्थितीत शनिवार दि.०८ एप्रिल २०२३ या दिवशी जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे राज्य, विभाग, जिल्हा, तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी, सदस्य यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. कृपया आपण याची नम्रपणे नोंद घ्यावी व सहभाग नोंदवावा. ग्रामीण भागातल्या एका छोट्याशा खेडेगावांमध्ये लोकसहभागातून शेतकऱ्यांचे खरेखुरे जीवन समजून घेण्यासाठी, आपण हे साहित्य संमेलन घेत आहोत. आपली गैरसोय होणार नाही या दृष्टिकोनातून आपल्या येण्याची स्पष्टता आपण कळवावी, म्हणजे आयोजकाला आपली व्यवस्था करणे सोपे जाईल ही नम्र विनंती.

बैठकीचे ठिकाण: उजेड ता. शिरुर अनंतपाळ जि. लातूर
वेळ: दु.०२ ते ०४ 
दि.०८ एप्रिल २०२३

संपर्क: सतीश हानेगावे ९४२१३७४४१९
प्रदेश संघटक-जगद्गुरु तुकोबाराय
साहित्य परिषद, महाराष्ट्र

ज्ञानदेव बरमदे ८९८३११५२७१
कोषाध्यक्ष -जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद विभाग, छत्रपती संभाजीनगर 

Post a Comment

0 Comments