Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या प्रयत्‍नातून ३२ ग्रामपंचायतींना जनसुविधा अंतर्गत ३ कोटी २० लक्ष रूपयाचा निधी मंजूर*

आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या प्रयत्‍नातून ३२ ग्रामपंचायतींना जनसुविधा अंतर्गत ३ कोटी २० लक्ष रूपयाचा निधी मंजूर


मुख्य संपादक :- शिवाजी निरमनाळे
                        9890098685

लातूर (प्रतिनिधी)

जिल्‍हा वार्षीक योजनेतून जनसुविधेसाठी विशेष अनुदान या योजने अंतर्गत भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या प्रयत्‍नातून लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील ३२ गावच्‍या ग्रामपंचायती अंतर्गत विविध ४५ कामासाठी तब्‍बल ३ कोटी २० लक्ष रूपयाचा निधी मंजूर झाला आहे. सदरील निधी मंजूर झाल्‍याने त्‍या त्‍या गावातील भाजपाच्‍या लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्‍यासह नागरीकांनी आ. कराड यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे.

जिल्‍हयाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्‍या माध्‍यमातून जिल्‍हा वार्षीक योजने अंतर्गत ग्रामपंचायतीला जनसुविधेसाठी विशेष अनुदान या योजनेतून भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या प्रयत्‍नातून लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील लातूर तालुक्‍यातील २२ गावात ३१ कामासाठी २ कोटी १८ लक्ष रूपये, रेणापूर तालुक्‍यातील ८ गावातील ११ कामासाठी ८३ लक्ष रूपये आणि भादा सर्कल मधील २ गावातील ३ कामासाठी १८ लक्ष रूपये याप्रमाणे एकूण ३ कोटी १९ लक्ष ८५ हजार रूपये इतका निधी मंजूर झाला आहे.

मंजूर झालेल्‍या गावात लातूर तालुक्‍यात सोनवती पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता तयार करणे दोन कामासाठी १० लक्ष, सोनवती स्‍मशानभूमी संरक्षण भिंत सुशोभिकरण व सौर विद्युतीकरण ७ लक्ष ५० हजार, सावरगाव पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे दोन कामे १६ लक्ष, शिवणी खु. पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे ५ लक्ष, भिसे वाघोली सिमेंट रस्‍ता करणे आणि नाली बांधकाम दोन कामे १५ लक्ष,  रूई दिंडेगाव पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे ३ लक्ष, येळी आरओ फील्‍टर व शेड बांधकाम करणे ५ लक्ष रूपये, मसला पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे ७ लक्ष, भातखेडा सिमेंट कॉक्रीट रस्‍ता करणे, पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे, सिमेंट नाली करणे तीन कामे २२ लक्ष, भातांगळी सिमेंट रस्‍ता करणे ७ लक्ष, भाडगाव पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे ९ लक्ष, भडी पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे ७ लक्ष ५० हजार, निवळी पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे ९ लक्ष ७५ हजार, दगडवाडी स्‍मशानभूमी शेड बांधकाम करणे व सुशोभिकरण ९ लक्ष, चिंचोली (ब.) नाथ मंदिर चौक पेव्‍हर ब्‍लॉक करणे आणि सिमेंट रस्‍ता दोन कामासाठी १४ लक्ष, जेवळी नवीन वस्‍तीत नाली बांधकाम करणे आणि स्‍मशानभूमीकडे जाणारा सिमेंट रस्‍ता करणे दोन कामे १० लक्ष, जवळा बु. स्‍मशानभूमी परिसर विकसीत करणे ७ लक्ष, चिखुर्डा दलित वस्‍ती स्‍मशानभुमी शेड बांधकाम करणे ४ लक्ष २५ हजार, गातेगाव पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे ९ लक्ष ७५ हजार, कारसा ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे आणि पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता व नाली करणे दोन कामे १७ लक्ष, खुलगापूर ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे १० लक्ष, कासार जवळा सिमेंट रस्‍ता करणे ७ लक्ष ५० हजार, काटगाव सार्वजनिक स्‍मशानभूमी परीसर विकसीत करणे ७ लक्ष, रेणापूर तालुक्‍यात हारवाडी पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे ७ लक्ष, सांगवी पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे ५ लक्ष,  रामवाडी पा. सिमेंट रस्‍ता व नाली बांधकाम दोन कामे १७ लक्ष, मोटेगाव पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे ७ लक्ष, पानगाव सिमेंट रस्‍ता करणे आणि मातंग समाज स्‍मशानीभूमी विकसीत करणे १७ लक्ष, गव्‍हाण ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे आणि सिमेंट रस्‍ता करणे दोन कामे १७ लक्ष, खरोळा सिमेंट रस्‍ता  करणे ७ लक्ष, ईटी सिमेंट रस्‍ता करणे ७ लक्ष ५० हजार, भादा सर्कल मधील भेटा पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे आणि स्‍मशानभूमी संरक्षण भिंत बांधकाम व सुशोभिकरण दोन कामासाठी ११ लक्ष, बिरवली सिमेंट रस्‍ता करणे ७ लक्ष याप्रमाणे निधी मंजूर झाला आहे.

सदरील ग्रामपंचायतीना निधी मंजूर झाल्‍याबद्दल भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांचे त्‍या त्‍या गावातील भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, सरपंच यांच्‍यासह नागरीकांच्‍या वतीने आभार व्‍यक्‍त केले आहेत. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील गावागावात वाडी तांडयात शासनाच्‍या विविध योजनेच्‍या माध्‍यमातून विकास कामे व्‍हावी यासाठी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा  कराड यांनी वेळोवेळी सातत्‍याने विविध विभागामार्फत प्रयत्‍न केले. केलेल्‍या प्रयत्‍नामुळे आतापर्यंत कोटयावधी रूपये खर्चाची अनेक कामे मंजूर झाली आहेत. त्‍यासाठी लागणारा निधीही उपलब्‍ध झाला आहे. यामुळे मतदार संघातील गावागावात आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या बाबतीत कार्यसम्राट आमदार कामगिरी दमदार असेच बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments