वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे
'खिळेमुक्त झाड' अभियान
औसा रोडवरील जवळपास 50 झाडांना केले खिळेमुक्त; जाहिराती लावण्यासाठी झाडांना खिळे मारू नका केले आवाहन
लातूर :
लातूर शहरातील व्यावसायिक, खाजगी क्लासेस चालक आपल्या व्यवसायाच्या जाहिराती लावण्यासाठी झाडांना मोठ्या प्रमाणावर खिळे मारतात. झाडेही सजीव असून, त्यांना खिळे मारल्याने झाडांनाही वेदना होतात. यासाठी वसुंधरा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने 'खिळेमुक्त झाड' हे अभियान शहरात सुरू करण्यात आले असून, या अंतर्गत रविवारी औसा रोडवरील जवळपास 50 झाडांना खिळेमुक्त करण्यात आले. शिवाय, व्यावसायिकांनी आपल्या जाहिराती लावण्यासाठी झाडांना खिळे मारू नये, असे आवाहनही वसुंधरा प्रतिष्ठानने केले आहे.
लातूर शहरातील व्यावसायिक, क्लासेस चालक हे झाडांवर आपल्या जाहिरात डकवितात. यासाठी झाडांना मोठ्या प्रमाणावर मोठं मोठे खिळे मारतात. यामुळे झाडांना मोठ्या प्रमाणावर वेदना होतात. या मोठं मोठ्या खिळ्यांमुळे झाडांची वाढही खुंटते. झाडे माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजन देतात, मात्र या झाडांना खिळे मारून त्यांना वेदना दिल्या जात आहे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. झाडांना मारलेले खिळे काढण्याची विशेष मोहीम वसुंधरा प्रतिष्ठानने सुरू केली असून, या अंतर्गत रविवार 2 एप्रिल 2023 रोजी औसा रोड मुख्य रस्त्यावर खिळेमुक्त झाड अभियान मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत सुमारे 50 झाडांना खिळेमुक्त करण्यात आले. एका-एका झाडाला जवळजवळ 6 ते 7 खिळे मारण्यात आले. या सर्वच झाडांना खिळेमुक्त करण्यात आले असून, झाडांना खिळे मारू नये असे आवाहन व्यावसायिकांना करण्यात आले आहे. या उपक्रमात वसुंधरा प्रतिष्ठानचे प्रा.योगेश शर्मा, अमोलआप्पा स्वामी, प्रा.डॉ. अजित चिखलीकर, शिवाजी निरमनाळे, उमेश ब्याकुडे आदींनी सहभाग नोंदवला.
*विनंती आमची साथ तुमची, व्यावसायिकांनो झाडांना वेदना देऊ नका : प्रा.योगेश शर्मा*
*************************
आपल्या जाहिराती झाडांवर लावण्यासाठी व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर झाडांना खिळे मारतात. झाडांना खिळे मारल्याने निश्चितच झाडांनाही वेदना होतात. वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने शहरात 'खिळेमुक्त झाड अभियान' राबविण्यात येत असून झाडांना मारलेले खिळे काढले जात आहेत. व्यावसायिकांनी झाडांना खिळे न मारता दोरीच्या साह्याने जाहिराती लावाव्यात असे आवाहन वसुंधरा प्रतिष्ठानचे प्रा.योगेश शर्मा यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments