मनमानी रीडिंग देणाऱ्या गुत्तेदाराचा परवाना रद्द करावा शिवसेना व युवासेनेची मागणी
मुख्य संपादक:- शिवाजी निरमनाळे
9890098685
निलंगा:
घरगुती मीटरचे रेडींग न पाहताच महावितरणकडून गुत्तेदाराच्या माध्यमातून रेडींग दिले जात आहे, या नाहक त्रासाला ग्राहक कंटाळून गेले आहेत तरी अशा मनमानी रीडिंग देणाऱ्या गुत्तेदाराचा परवाना तात्काळ रद्द करावा अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी महावितरणकडे केली आहे.
दोन ते तीन महिन्यापासून मीटर न पाहता मनमानी रीडिंग देऊन महावितरण सामान्य मानसाला पैसे जास्त भरायला लावत आहेत. मीटरवर रीडिंग कमी असताना सुद्धा किंवा मीटर बंद असताना सुद्धा मनमानी रीडिंग दिली जात आहे. मौजे ननंद ,येथील परशुराम श्रीकांत भोजने ,मीटर क्रमांक 62 63 00 2 6 8 4 9 4 हा असून मागील तीन महिन्यापासून मीटर बंद असताना सुद्धा प्रत्येक महिन्याला म्हणजेच जानेवारी दीडशे युनिट, फेब्रुवारी दीडशे युनिट व मार्च मध्ये सुद्धा दीडशे युनिट असे बिल आलेल आहे .जानेवारी व फेब्रुवारी चे 26 60 रुपये भरले असताना सुद्धा मार्च महिन्याचे तेराशे वीस रुपये बिल आलेले आहे. 13 मार्च 2023 रोजी मीटर बदलण्यासंदर्भात अर्ज देऊन सुद्धा आजतागायत मीटर बदलले गेले नाही व अशा प्रकारे अनेक ग्राहकाचे बिल दिले जात आहे. तरी अशा मनमानी बिल देणाऱ्या गुत्तेदाराचा तात्काळ परवाना रद्द करावा व योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा शिवसेना व युवा सेनेच्या तीव्र वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना युवा सेनेच्या वतीने देण्यात आला. निवेदन देताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे, तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments