अपंगांना निधी व विविध सुविधा तात्काळ मिळाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन: प्रा. मिरगाळे
मुख्य संपादक:- शिवाजी निरमनाळे
9890098685
निलंगा:
शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातून वार्षिक पाच टक्के निधी अपंगावर खर्च करणे अपेक्षित असताना आज तागायत अपंगांना एकही रुपयाही निधी मिळत नसून तात्काळ त्यांना निधी व विविध सेवा उपलब्ध करून द्याव्यात अशा आशयाचे निवेदन युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी गटविकास अधिकारी यांना दिला आहे.
ग्रामविकास विभागाच्या निर्णयाप्रमाणे 2015 पासून आजतागायत अपंगांना पंचायत समिती व ग्रामपंचायतच्या उत्पन्नातून पाच टक्के निधी मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र अपंगांना नाममात्र निधी मिळत आहे. बहुसंख्य अपंगांना एक रुपयाही निधी मिळाला नाही. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक अपंग 2015/ प्र.क्र.137/ वित्त 3 प्रमाणे अपंगांना पाच टक्के निधी मिळणे अपेक्षित असताना नणंद गावातील काही अपंगांना 110 रुपये निधी तर काही अपंगांना एक रुपयाही आजतागायत निधी मिळाला नाही. ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या माध्यमातून अपंगांना पाच टक्के निधी तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करावेत व अपंगांना शासनाच्या माध्यमातून असणाऱ्या विविध सेवासुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे.

Post a Comment
0 Comments