*तथागत भगवान बुद्धांची शिकवण मानवाला उपकारक
भिक्खू पय्यानंद थेरो*
मुख्य संपादक:- शिवाजी निरमनाळे
9890098685
लातूर :-( प्रतिनधी)
जगात अनेक संप्रदाय, पंथ आणि धर्म निर्माण होऊन मानवाच्या मांगल्यासाठी निरनिराळे तत्वज्ञान व सिद्धांत प्रतिपादित करण्यात आले आहेत. विविध रूढी आणि परंपराना अनुसरून मानव आपले जीवन जगत असतो. परंतु तथागत भगवान बुद्धाचे तत्वज्ञान, सिद्धांत आणि शिकवण समस्त विश्वातील मानवाबरोबर सर्व प्राणी मात्रांसाठी देखील उपकारक आणि सुखकारक असल्याचे प्रतिपादन भिक्खू पय्यानंद थेरो यांनी केले.
चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने शहरातील नालंदा बुद्ध विहार, प्रकाश नगर, लातूर येथे प्रज्ञा महिला मंडळाच्यावतीने धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते धम्मदेसना देताना बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध पूजा व वंदनेने करण्यात आली.
पुढे बोलताना भिक्खू पय्यानंद थेरो म्हणाले की, विश्व वंदनिय बुध्दाची शिकवण ही दया, शांती, शील, सदाचार, नीतिमत्ता, मैत्री व मानवता यावर आधारलेली असून केवळ हिच शिकवण आणि उपदेश मनुष्याला मानवी समाजात सुखाने व आनंदाने जगण्यासाठी उपयुक्त आहे. निरर्थक रूढी, परंपरा, चालीरिती, अंधश्रद्धा आणि कर्मकांड यामुळे मनुष्य सदोष आणि अज्ञानी होतो. अज्ञान हे बुद्धीमत्तेचे आंधळे पटल असून मानवाची बुद्धिमत्ता अशक्त करण्याची अवस्था आहे म्हणूनच डोळसपणाने ज्ञानपूर्वक जीवन जगणे हा योग्य जीवन मार्ग होय असेही ते म्हणाले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.दुष्यंत कटारे म्हणाले की, चैत्रपौर्णिमेस प्राचीन इतिहासातील प्रसिद्ध गृहीणी सुजाता हिने तथागतास खीर दान अर्पण केली त्याच भोजनामुळे तथागतास ज्ञान प्राप्ती झाल्याचा ऐतिहासिक दाखला पाली त्रिपिटक बौद्ध साहित्यात पाहावयास मिळतो.
या कार्यक्रमास मधुकर शृंगारे, दगडू लांडगे, भानुदास गायकवाड, मारोती सरवदे, बाबुराव बनसोडे, कमल गाडे, प्रमिला आपटे, आशा उडानसिंह, करुणा सूर्यवंशी, राजश्री लांडगे इत्यादी उपासक-उपासिका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद धावारे यांनी केले तर आभार डॉ.अरुण कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वतीतेसाठी प्रज्ञा महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला सुरवसे, विद्या आल्टे, मीनाक्षी कांबळे, विद्या सुरवसे, वच्छला परमेश्वरे, हेमलता गायकवाड आदी महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments