Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*विद्यार्थ्यांनी वाचन, चिंतन आणि लेखन करावेकुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के*

*विद्यार्थ्यांनी वाचन, चिंतन आणि लेखन करावे
कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के*

 
लातूर 


विद्यार्थ्यांनी वाचन, चिंतन आणि लेखन करावे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी केले. 
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर राज्यशास्त्र विभागा तर्फे आयोजित वैचारिक साहित्याला वाहिलेल्या गेली सदतीस वर्षे गुणवत्ता व सातत्य जपून लातूर येथून प्रकाशित होणाऱ्या विचारशलाकाच्या चार्वाक तत्त्वज्ञान या विशेषांकाच्या विमोचन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विचारशलाकाचे संपादक प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार, प्राचार्य डॉ.सुनीलकुमार कुरणे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रकाश पवार, प्रा.डॉ.सुखदेव उंदरे, प्रा.डॉ.नेहा वाडेकर आणि डॉ.जयश्री कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
पुढे बोलताना कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के म्हणाले की, आज विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड कमी होत आहे. विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक समाज माध्यमापासून दूर राहून मौलिक ग्रंथाचे वाचन करावे. ग्रंथ वाचन हे त्यांच्यासाठी व समाजासाठी अत्यंत लाभदायक आहे. नैसर्गिक शास्त्राप्रमाणे सामाजिक शास्त्र आणि भाषा यांच्यासाठी देखील प्रयोगशाळा असणे आवश्यक आहे. यामुळे शिक्षणाला आणि संशोधनाला निश्चित दिशा व आशय प्राप्त होईल. विचारशलाका महाराष्ट्रातील एक नामांकित नियतकालिक आहे असे सांगून त्यांनी विचारशलाकाच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सुद्धा दिल्या.  
यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रकाश पवार प्रास्ताविक करताना म्हणाले की, विचारशालाका लातूर सारख्या तुलनेने लहान शहरामधून प्रकाशित होत आहे. तरीपण विचारशलाकानी  आज महाराष्ट्रामध्ये नावलौकिक संपादन केलेला आहे. विचारशलकाचे सर्वच अंक मूलभूत व मौलिक विषयावर असल्यामुळे ते वाचक व समाजासाठी उपयुक्त आहेत. 
यावेळी विचारशलाकाचे संपादक प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,  समाज प्रबोधनाच्या हेतूनी सुरू करण्यात आलेल्या विचारशलाकानी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक अंक हा विशेषांक काढण्याची एक नवीन परंपरा निर्माण केलेली आहे. विचारशलाकानी आतापर्यंत सामाजिकशास्त्रातील मूलभूत संकल्पना, तत्व, अभ्यासक आणि समाज व राष्ट्र समोरील विविध आवाहनावर विशेषांक प्रकाशित केलेले आहेत. विचारशलाकानी महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळी आणि कार्यकर्त्यांना वैचारिक आधार, दिशा व दृष्टी देण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे. विचारशलाका महाराष्ट्र फौउंडेशनचा ५०००० रु.चा पुरस्कार व महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचा किर्लोस्कर पुरस्कार आदी पुरस्कारानी सन्मानित आहे. विचारशलाकावर एका संशोधकांनी पीएच.डी. व दोन संशोधकांनी एम.फील.पदवी प्राप्त केली आहे.
या कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रा.डॉ.प्रकाश पवार यांनी केले. 
या कार्यक्रमाला पीएच.डी.संशोधक आणि राज्यशास्त्र विभागातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments