*जगतज्योती महात्मा बसेश्वर महाराज जयंतीनिमित्त ह.भ.प.कु. शितलताई साबळे पाटील यांचे कीर्तन*
मुख्य संपादक:- शिवाजी निरमनाळे
9890098685
निलंगा:
जगतज्योती महात्मा बसेश्वर महाराज जयंतीनिमित्त समाज प्रबोधनकार, सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.कु. शितलताई साबळे पाटील यांचे कीर्तन मौजे.नणंद येथे ठेवण्यात आलेले आहे तरी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे अहवान जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती समितीचे अध्यक्ष प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी केले आहे.
समतानायक जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी मौजे. नणंद येथे सकाळी नऊ वाजता भजनी मंडळ, आराधीमंडळ व पालखीसह महात्मा बसवेश्वरांची भव्य अशी मिरवणूक काढली जाणार आहे व संध्याकाळी आठ वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार, समाज प्रबोधनकार ह.भ.प.कु. शितलताई साबळे पाटील यांचे कीर्तन ठेवण्यात आलेला आहे. तरी निलंगा तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी या किर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे अहवान समस्थ नणंद ग्रामस्थांच्या वतीने व जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती समितीचे अध्यक्ष प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments