*महाराष्ट्र प्राथमिक विद्यालयात जगद्ज्योती महात्मा बसवेश्वरांना अभिवादन*
मुख्य संपादक :- शिवाजी निरमनाळे
9890098685
औराद शहाजानी (प्रतिनिधी) :
येथील महाराष्ट्र प्राथमिक विद्यालयात जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक महेबूब लष्करे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महात्मा बसवेश्वरांनी ९०० वर्षापूर्वी समाजातील गरिबी, विषमता दूर करण्यासाठी 'काय कवे कैलास' अर्थात कर्म करण्यातच स्वर्ग आहे हा विचार समाजापुढे मांडला. समाजातील प्रत्येकाने सदाचाराने आचरण करावे, नीती नियमांचे पालन करावे, अनाचार करू नये, रागावू नये असे त्यांनी सांगितले. जातीच्या भिंती भेदून समाजव्यवस्थेला वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा यांना उलथून टाकण्याचे काम केले. हा कार्यक्रम मुख्याध्यापक महेबूब लष्करे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालाजी मरळे यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी परिश्रम केले. याप्रसंगी रमेश थेटे, ज्ञानेश्वर थेटे, संजय कुलकर्णी, हेमा मोरे, शोभा बिराजदार, डोईजोडे मंगल, संतय्या स्वामी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments