*शेळगीत बिरूदेव यात्रा*
मुख्य संपादक शिवाजी निरमनाळे
9890098685
शेळगी (प्रतिनिधी ) : निलंगा तालुक्यातील शेळगी येथे भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बिरुदेव व महालिंगराया यात्रा दि २३ ते २४ एप्रिल दरम्यान होत आहे. या यात्रेदरम्यान पालखी सोहळा, वाघ्या मुरळी कार्यक्रम, अभिषेक, महापूजा, महाआरती आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि २३ एप्रिल रोजी पहाटे देवाची मंगलस्नान पूजा, संध्या ९ ते १ वाजेपर्यंत बिरुदेव कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दि २४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता श्री बिरुदेवाचे शाही रथातून शेळगी गावातून प्रस्थान होऊन मंदिराकडे पालखी रथाच्या भव्य मिरवणुकीसह आगमन होईल. त्यानंतर महाआरती व महाप्रसाद होणार आहे. या निमित्त मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली असून रंगरंगोटीसह विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीचे बाबुराव सूर्यवंशी, माजी उपसरपंच साधूराम मरळे, प्रा संतराम ढेबे, भीम मरळे, राम सूर्यवंशी, मोहन मरळे, व्यंकट सूर्यवंशी, सिद्राम सूर्यवंशी, सत्यवान मरळे, गणेश मरळे, पिंटू मरळे, सहदेव ढेबे यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments