Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*तलाठी ननावरे व मुख्याध्यापक पवार आदर्श पुरस्काराने सन्मानित*



*तलाठी ननावरे व मुख्याध्यापक पवार आदर्श पुरस्काराने सन्मानित*

मुख्य संपादक शिवाजी निरमनाळे
                     9890098685

निलंगा- 
निलंगा तालुक्यातील नणंद गावचे तलाठी निळकंठ ननावरे यांना लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद शाळा नणंदचे मुख्याध्यापक पवार यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा ना.य.डोळे तालुकास्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला.
            ननंद सज्जाचे तलाठी निळकंठ ननावरे यांच्या आतापर्यंत केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आदर्श तलाठी म्हणून पुरस्काराने गौरवण्यात आले व ननंद गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पवार सर यांना शिक्षक समिती संघटनेच्या वतीने प्रतिष्ठेचा समजला जाणारा आदर्श मुख्याध्यापक म्हणून ना.य.डोळे तालुकास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी शिक्षक, शिक्षण समिती व युवासेनेच्या वतीने मुख्याध्यापक पवार यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रम राबवून मुलांच्या कलागुणांना वाव दिला त्याचीच पोचपावती म्हणून पवार सरांना ना.य. डोळे तालुकास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असे मत युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांनी सत्कार समारंभाप्रसंगी आपले मत व्यक्त केले. नणंद गावाचे तलाठी निळकंठ ननावरे यांना सुद्धा याप्रसंगी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे किरण पाटील, दयानंद पाटील, उद्धव जाधव, विवेक टाकेकर, बालाजी गिरी इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments