*शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी पात्र*
*जिल्हा परिषद शाळेत गुणवत्तेची हमी; आता होणार नाही पटसंख्या कमी*
मुख्य संपादक:- शिवाजी निरमनाळे
9890098685
शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तगरखेडा येथील इयत्ता पाचवी मधील *चि.गणेश बालाजी गुत्ते व कु.अंजली बालाजी पाटील* हे दोन विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत.
पात्र विद्यार्थी त्यांच्या पालकांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री चिल्लाळे सर यांनी पुष्पगुच्छ व गुणपत्रक देऊन स्वागत केले.
*जिल्हा परिषद शाळेत गुणवत्तेची हमी; आता होणार नाही पटसंख्या कमी*
लातूर जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा, खाजगी शाळेमध्ये आपल्या पाल्यांना शिक्षण मिळावे तेथे दर्जेदार शिक्षण मिळते अशी समज पालकांमध्ये झाली आहे. जिल्हा परिषद शाळेत गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळणार नाही अशी भावना पालकांची झाली आहे हे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरून दिसून येते पण आता परिस्थिती बदलली आहे.
शैक्षणिक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. शासनाच्या विविध योजनेद्वारे जिल्हा परिषद शाळेच्या चेहरा मोहरा बदलला आहे. वेगवेगळ्या सुविधा सहज विद्यार्थ्यांना मिळू लागले आहेत. बाला उपक्रमांने तर लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेचे भौतिक, सामाजिक व शैक्षणिक बदल घडवून आणले आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तगरखेडा. तगरखेडच्या शाळेचे बाला उपक्रमांने शाळेच्या भिंती परिसर बोलका झाला विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावण्यात बाला उपक्रमांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे विशद होत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तगरखेडा येथील शेतकऱ्यांच्या मुलं पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झाली आहेत. यात गणेश बालाजी गुत्ते यांने १४० गुण, शेकडा ४६.६५% घेऊन पात्र झाला आहे.तर अंजली बालाजी पाटील हिने१२८ गुण, शेकडा ४२.६६% घेऊन पात्र ठरली आहे. त्यांच्या पालकांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापकांनी स्वागत करून शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
तगरखेडच्या ग्रामस्थांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments