'इतिहासातील सत्य जगासमोर आले पाहिजे व इतिहासाचे विकृतीकरण थांबले पाहिजे.'
- सतीश हानेगावे
प्रदेश संघटक जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र तथा संत गाडगेबाबा राष्ट्रीय महासचिव प्रबोधन मंच
निलंगा:
मराठा सेवा संघ व सर्व कक्षांच्या अंतर्गत निलंगा येथील जिजाऊ सृष्टीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची ३६७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून विवेक सौताडेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन कार्य लोकांच्या समोर ठेवले. विविध घटना, प्रसंग व इतिहासाचे अनेक दाखले देत त्यांनी संभाजी महाराजाचा ज्वलंत इतिहास उलगडून दाखविला.
अध्यक्षीय समारोप करताना सतीश हानेगावे यांनी, 'स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज व आजची युवा पिढी' या विषयावर बोलताना धर्मरक्षक संभाजी, क्षात्ररक्षक संभाजी, शाक्तवीर संभाजी, व स्वराज्य रक्षक संभाजी या साऱ्या गोष्टीचा सोहदाहरण उलगडा करून दाखविला. संभाजी महाराजांच्या जीवन चरित्राच्या विकॄतीकरणाचे मूलस्त्रोत मल्हार रामराव चिटणीस यांची बखर जी संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १२२ वर्षांनी लिहिण्यात आली. कृष्णाजी अनंत सभासद यांची बखर जी संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर आठ वर्षांनी लिहिण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांना मनुस्मृतीच्या संहितेनुसारच का मारण्यात आले? हे इतिहासातील जळजळीत सत्य दाखल्यासहित उलगडून दाखविले. संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आजपर्यंत ३७४ नाटके लिहिण्यात आलेली असून अनेक कथा, कादंबरी, महाकाव्य,शाहिरी यातून त्यांच्या वैयक्तिक जीवनाचे व चारित्र्याचे विकृतीकरण कसे केले गेले याचा थोडक्यात आढावा घेतला. रायाप्पा महार व त्यांच्या दोन बंधूचे योगदान, जना परटिण व त्यांच्यासोबतच्या विविध जातींतील महिला, मियांखान यांचा इतिहासही आजच्या युवकांना माहिती असणे गरजेचे आहे. आजच्या युवा पिढीला महापुरुषांचा सत्य इतिहास माहिती असला पाहिजे व परंपरेपासून चालत आलेले इतिहासाचे विकृतीकरण थांबले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. जगातील पहिले बुलेट प्रुफ जॅकेट, पाण्यावर तरंगणारा तोफखाना, उसळत्या सागरात ८०० मीटरचा पूल बांधणारा राजा, डोंगर पोखरून जल नियोजन करणारा समाजसेवक, नऊ वर्ष अनेक राजांना पराभूत करीत एकदाही पराभूत न झालेला हा राजा कसा जागतिक किर्तीचा राजा होता हे पटवून सांगितले.
दीप प्रज्वलन व राष्ट्रमाता जिजाऊ , छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. अमरदीप पाटील यांनी जिजाऊ वंदना गायली. प्रास्ताविक मोहन घोरपडे तर सूत्रसंचालन उत्तम शेळके यांनी केले. आभार एम. एम. जाधव यांनी मानले. या कार्यक्रमांमध्ये संभाजी नवघरे, वनिताताई काळे, बोराडे ताई, समाधानताई माने, डॉ. अरविंद भातांबरे, बाळासाहेब शिंगाडे, मधुकर माकणीकर, लालासाहेब देशमुख, पीएस सगरे, ज्ञानदेव गुंडुरे, डीबी बरमदे, अंबादास जाधव, विनोद सोनवणे, मनोज कोळ्ळे, विलास सुर्यवंशी, रजनीकांत कांबळे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ए.पी. जाधव, कुमोद लोभे, आर. के. नेलवाडे, प्रमोद जाधव, बाळू बिरादार, प्रताप हंगरगे, दत्ता मुळजे, डीबी बाबळसुरे, किरण धुमाळ, आनंद जाधव, रंजना जाधव, राजश्री शिंदे, दैवशाला बरमदे, आरती जाधव इत्यादींनी परिश्रमा घेतले.

Post a Comment
0 Comments