*भूमीअभिलेख कार्यालयाकडून मिळालेल्या पत्राआधारे शेतकऱ्याचे उपोषण मागे*
मुख्य संपादक :- शिवाजी निरमनाळे
9890098685
निलंगा-
निलंगा तालुक्यातील मौजे. सरवडी येथील शेतकरी रावसाहेब विठ्ठल काटकर हे शेतरस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ काढावे व रस्ता खुला करून देण्यासंदर्भात मागील दोन दिवसापासून तहसील कार्यालय निलंगा येथे उपोषणास बसले असता युवासेनेच्या प्रयत्नाने भूमीअभिलेख कार्यालयाकडून तात्काळ मोजणीचे पत्र काढल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले.
मौजे. सरवडी येथील अपंग व्यक्ती रावसाहेब विठ्ठल काटकर यांनी मागील एक वर्षापासून शेतीला जाण्यासाठी सर्वे नंबर 49 मधून रस्त्यासाठी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. त्यासंदर्भात प्रशासनाने तात्काळ मोजण्याचे आदेश दिले असताना सुद्धा संबंधित मोजणीदार व मंडळ अधिकारी यांनी जायमोक्यावर गेले असताना अनेक अडथळे आले व मोजणी ही झालीच नाही. तात्काळ मोजणी करण्यासंदर्भात व रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता देण्यासंदर्भात रावसाहेब विठ्ठल काटकर हे अपंग शेतकरी दि. 16. 05.2023 पासून तहसील कार्यालय निलंगा येथे उपोषणास बसले असता त्यांची दखल प्रशासन घेत नव्हते. यासंबंधी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांना ही माहिती कळताच त्यांनी तत्काळ भूमीअभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी तात्काळ मोजणी करण्यासंदर्भात दिनांक 26.05. 2023 रोजीचे पत्र उपोषणकर्ते अपंग शेतकरी रावसाहेब विठ्ठल काटकर यांना मोजणीचे पत्र भूमीअभिलेख कार्यालयाचे अतुल जोंधळे, मंडळाधिकारी देशमुख, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे, शिवसेनेचे नागनाथ बाबळसुरे यांच्या हस्ते पत्र देऊन व सरबत पाजून उपोषण मागे घेण्यात आले . यावेळी शंकर मनाळे, नितीन मोहिते, विनय इंगळे, मारुती काटकर ,नागनाथ काटकर, मोतीराम घाडगे, माधव गवळी इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments