Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*थायलंड बुद्ध धम्म दर्शन सहल अभ्यास दौरा २०२३ लातूर शहरातून रवाना*


*थायलंड बुद्ध धम्म दर्शन सहल अभ्यास दौरा २०२३ लातूर शहरातून रवाना*

लातूर 

जगातील अनेक बौद्ध राष्ट्रापैकी थायलंड हे राष्ट्र बौद्ध धम्म प्रचार प्रसारासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. या राष्ट्रातील बौद्ध धम्माची माहिती, सर्व घटनांचा अभ्यास व प्रत्यक्ष दर्शन व्हावे या दृष्टीकोनातून आपल्या भागातील उपासक-उपासिकांसाठी ही बुद्ध धम्म दर्शन सहल अभ्यास दौरा २०२३ आयोजित केल्याचे संयोजक भिक्खू पय्यानंद थेरो यांनी दिली.   
थायलंड बुद्ध धम्मदर्शन सहलीत दि. १८ ते २५ मे २०२३ या कालावधीमध्ये बँकाक, पटाया आणि आयुध्या आदि ठिकाणी भेटी देण्यात येणार आहे. लातूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणावरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून सहभागी सर्व व्यक्तींचे स्वागत करून ही सहल हैद्राबाद एअरपोर्टकडे रवाना करण्यात आली तेथून विमानाने प्रवास करून हे सर्व सहभागी थायलंडला पोहोचणार आहे. यावेळी भिक्खू बुध्दशील, भिक्खू इंदवंस, केशव कांबळे, डॉ.अरुण कांबळे, डॉ.सुमेध कांबळे, अनिरुद्ध बनसोडे, उदय सोनवणे, निलेश बनसोडे, प्रा.सतीश कांबळे, प्रा.मा.ना.गायकवाड, डॉ.संजय गवई, विशाल वाहुळे, अविनाश आदमाने, सरिता बनसोडे, सुमन उडानशिव, शकुंतला नेत्रगावकर, मिलिंद धावारे यांच्यासह कौटुंबिक सदस्य उपस्थित होते. 
यावेळी संयोजक भिक्खू पय्यानंद थेरो यांनी सहली संबंधी असलेल्या विविध नियमावलीची माहिती सुद्धा त्यांना दिली आणि सहभागी व शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व उपासक-उपासिकांचे आभार व्यक्त केले. 
या सहलीमध्ये पूजनीय भिक्खू पय्यानंद थेरो यांच्यासमवेत प्रमिला आपटे, मारोती आपटे, दगडु लांडगे, वसंत सुर्यवंशी, सुशिला भुताळे, बाबुराव गायकवाड, हेमलता गायकवाड, सुर्यभान वीर, श्यामल वीर, केशव गायकवाड, वैशालीताई गायकवाड, सुधाकर कांबळे, अनुसया कांबळे, मुकुंद वाघमारे, प्रणिताताई वाघमारे, विठ्ठल जाधव, अर्चनाताई जाधव, पंचशिलाताई सुरवसे, द्रोपदी जयद्रथ जाधव, किसन कांबळे, मोहन सातपूते, मंगलताई सातपुते, छाया श्रीमाळे, प्राचार्य डॉ.दुष्यंत कटारे, सुनंदाताई कटारे, बेबीताई कांबळे, अरुण गायकवाड, पांडुरंग अंबुलगेकर, अशोक कांबळे, उषाताई कांबळे, सुशिल चिकटे, आशाताई चिकटे, सतिश सुरवसे, वत्सला सुरवसे, माधव कांबळे, सुदाम कांबळे, शोभाताई कांबळे आणि सुहास रावळे यांचा समावेश आहे. 

Post a Comment

0 Comments