मुख्य संपादक शिवाजी निरमनाळे
9890098685
औराद शहाजानी
येथील बसस्थानकात नेहमीच तीन राज्यांच्या बसची दळणवळण सुरु आसते तसेच नेहमीच तीन्ही राज्यातील विद्यार्थ्यांना व महिलांना सतत या बसस्थानक परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे पाहुण बसस्थानक शेजारी संभाजी जावळे यांच्या माऊली हॉटेलमध्ये चहा घेत असताना चर्चेमध्ये विषय निघताच येथील काँग्रेस पक्षाचे पुढारी व विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य गोरख पांडुरंग नवाडे व बाळकृष्ण कलगाणे यांनी बसल्या बसल्या बसस्थानकात पाण्याच्या भटकंतीचे चित्र पाहुण एका तासातच प्रवाशांना पाण्याची सोय व्हावी या हेतुने तात्काळ संयुक्तपणे पाणपोई सुरु केली.
या बसस्थानकात सतत व्यावसायिक कामानिमित्त व शैक्षणिक कामानिमित्त विद्यार्थी व पालक तसेच अनेक वयोवृद्ध महिला, पुरुषांची बसस्थानकात सतत वर्दळ असते त्यामुळे या बसस्थानकात राज्य परिवहन विभागाच्या वतीने येथे सौचालय दुरुस्ती केलेली नाही तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने प्रवाशांना तर सोडा कर्मचाऱ्यांना सुध्दा मुलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे गावातील गोरख नवाडे व बाळकृष्ण कलगाणे या पुढाऱ्यांनी तसेच तरुणांनी पुढाकार घेतल्यामुळे तात्काळ पिण्याच्या पाण्याची सुविधा म्हणून पाणपोई सुरु करण्यात आली. या कामी त्यांना मदत म्हणुन अमोल ढोरसिंगे, संभाजी जावळे, नियंत्रक यादव माटेकर व राजकुमार शिवणे यांनी मोलाची मदत केली. व पाणपोई एका तासातच सुरु करण्यात आली.
यावेळी औराद वाहतुक नियंत्रक यादव माटेकर, गोरख नवाडे,हाजी सराफ, बाळकृष्ण कलगाणे , संभाजी जावळे, सलीम पठाण, अमोल ढोरसिंगे, सचिन सूर्यवंशी, राजकुमार शिवणे, दीपक कांबळे यांची उपस्थिती होती

Post a Comment
0 Comments