स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जेएसपीएमचे समन्वयक निळकंठराव पवार यांच्याहस्ते सत्कार
लातूर :-
जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेजचा एकूण निकाल 99.06 टक्के लागलेला आहे. यामध्ये कला शाखा 100 टक्के, वाणिज्य शाखा 100 टक्के, विज्ञान शाखा 100 टक्के व एमएसव्हीसी शाखेचा निकाल 96.96 टक्के लागलेला आहे. एकूण 213 विद्यार्थ्यांपैकी 211 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे. यामध्ये 13 विद्यार्थी विशेष प्राविण्यात 134 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 64 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल जेएसपीएम संस्थेचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार यांच्याहस्ते गुणवंतांना पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेजच्या कला, वाणिज्य, विज्ञान या तिनही शाखेचा निकाल 100 टक्के लागलेला आहे तर एमसीव्हीसी शाखेचा निकाल 96.96 टक्के लागलेला आहे. कला शाखेच्या एकूण 30 विद्यार्थ्यांपैकी तीसही विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. यामध्ये 87.33 टक्के गुण घेऊन निकीता माधव चितगिरे ही विद्यार्थीनी प्रथम आलेली आहे. 85.83 टक्के गुण घेऊन वैभवी सतीश हाके ही विद्यार्थीनी द्वितीय आलेली आहे तर ज्योती दिलीप चव्हाण ही विद्यार्थीनी 73.17 टक्के गुण घेऊन तृतीय आलेली आहे. विज्ञान शाखेचे एकूण 86 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यामध्ये श्रीनिवास सूर्यकांत खैरे हा विद्यार्थी 81.33 टक्के गुण घेऊन प्रथम आलेला आहे. ओमकार सिताराम वाघमारे हा विद्यार्थी 76.33 टक्के गुण घेऊन द्वितीय आलेला आहे तर रूकेश पल्लवी सोट ही विद्यार्थीनी 72.83 टक्के गुण घेऊन तृतीय आलेली आहे. वाणिज्य शाखेचे एकूण 31 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
यामध्ये 80.67 टक्के गुण घेऊन शेख महेक खुद्दूस हा विद्यार्थी प्रथम आलेला आहे. श्रध्दा नवनाथ मुळके ही विद्यार्थीनी 79.83 टक्के गुण घेऊन द्वितीय आलेली आहे तर श्रेया रूपेश डाके ही विद्यार्थीनी 79.15 टक्के गुण घेऊन तृतीय आलेली आहे. एसएससी व्होकेशनल विद्यालयाच्या 66 विद्यार्थ्यांपैकी 64 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून या शाखेचा एकूण निकाल 96.96 टक्के लागलेला आहे. यामध्ये संकेत संजय नानजकर 81.17 टक्के गुण घेऊन प्रथम आलेला आहे. ओम एकनाथ दुडीले 79.67 टक्के गुण घेऊन द्वितीय आलेला आहे तर शिवशंकर व्यंकट वाघमारे हा विद्यार्थी 76.83 टक्के गुण घेऊन तृतीय आलेला आहे.
त्यांच्या यशाबद्दल जेएसपीएम संस्थेचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार यांच्याहस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शैक्षणिक समन्वयक संभाजीराव पाटील,समन्वयक विनोद जाधव, समन्वयक बापूसाहेब गोरे, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी सूर्यवंशी, मुख्याध्यापक मोहन खुरदळे, मुख्याध्यापक शिवाजी सूर्यवंशी, शिवाजी शिंदे, मनाळे, दर्शने यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments