माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांच्या हस्ते
महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंताचा सत्कार
लातूर :-
जेएसपीएम संचलित महाराष्ट्र ज्युनियर कॉलेजचा एकूण निकाल 100 टक्के लागलेला आहे. यामध्ये कला शाखा 96 टक्के, वाणिज्य शाखा 100 टक्के, विज्ञान शाखा 100 टक्के असा निकाल लागला असून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गुणवत्तेची परंपरा कायम ठेवण्यास महाराष्ट्र विद्यालयाला यश मिळालेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील गुणवंताचा सत्कार भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व भाजपा युवा नेते तथा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्याहस्ते करण्यात आला.
महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेमध्ये 79.17 टक्के गुण घेऊन प्रथम आलेल्या गौरी दिलीप राठोड, 78.67 टक्के गुण घेऊन द्वितीय आलेल्या वैष्णवी हावगीराव गोपछडे व 77 टक्के गुण घेऊन तृतीय आलेल्या कपील प्रविण खट्टोड, वाणिज्य शाखेमध्ये 82.67 टक्के गुण घेऊन प्रथम आलेली संध्या रमेश सावळे, 79.83 टक्के गुण घेऊन द्वितीय आलेल्या प्रणिता तुकाराम आळंदकर व 79.67 टक्के गुण घेऊन तृतीय आलेल्या शेख निलोफर मैनुद्दिन यांच्यासह कला शाखेमध्ये 73.17 टक्के गुण घेऊन प्रथम आलेल्या अंजली प्रकाश शिंदे, 73.50 टक्के गुण घेऊन द्वितीय आलेला करण विनोद मोरे व 67 टक्के गुण घेऊन तृतीय आलेल्या सय्यद इशा पाशासाब यांचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जेएसपीएम शिक्षण संस्थेचे प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार, प्राचार्य मारूती सूर्यवंशी, उपप्राचार्य विठ्ठल चेवले, उपमुख्याध्यापक अनिल सोमवंशी, प्रा.लक्ष्मीकांत परिहार, जेएसपीएमच े जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब जाधव, अरून काळे, सरवदे मॅडम, सुचिता घाडगे मॅडम यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments