Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत लोखंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*


*सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत लोखंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*.      

लातूर:-
                       
 २१ मे कृषी विभागातील कृषी तज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत लोखंडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. रयत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक मार्गदर्शक श्री. सूर्यकांत लोखंडे यांचा वाढदिवस रयत प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजी व फुल विक्रेते यांचे ऊन्हापासून व पावसापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने रयत प्रतिष्ठांनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊन्हापासून व पावसापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने छत्र्यांचे वाटप करण्यात आले. 
याप्रसंगी रयत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामदास काळे, मार्गदर्शक सुनील कुमार डोपे, विधिज्ञ वैशालीताई यादव, नगरसेविका श्वेता लोंढे, शोभा पाटील, लोकाधिकार संघाचे संपादक संतोष पनाळे, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ जवळगे , प्रेरणा नर्सरी चे संचालक कल्याण घूगरे, मा देवेंद्रजी आयलाने मित्र मंडळाचे देवेंद्र आयलाने, उपाध्यक्ष सचिन फत्तेपूरे , सचिव नेताजी रणखांब , रवि दुडिले ,कार्यध्यक्ष श्रीराम कुलकर्णी , किसन शिवनगे , श्रीधर सुर्यवंशी, प्रंशात खाडप, किरण जाधव ,शिक्षक मंच चे अध्यक्ष अमोल जोशी , कमलाकर सुर्यवंशी , व्यापारी मंच चे अध्यक्ष अजित फुलारी , राहूल धौत्रे , जाधव सर , नवनाथ भोसले , वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ व्यंकट जगताप प्रशांत लोंढे  , रयत युवा मंच अध्यक्ष आकाश रणखांब , विनायक सुर्यवंशी , रीवाचे सर , शुभम आवाड , प्रसाद काळे , विशाल काळे ,  रयत प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

याप्रसंगी सूर्यकांत लोखंडे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच 40 भाजीपाला व फुल विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या सोबतच मा देवेंद्रजी आयलाने मित्र मंडळाच्या वतीने वृक्ष संवर्धन व तहानलेल्या झाडांना पाणी देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments