राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी
लातूर :-
महानगरपालिका हद्दीत सर्व लोखंडी जाहिरात फलकांचे (होल्डिंग) सर्वेक्षण करून बेकायदा फलकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी.
गेल्या चार दिवसांपुर्वी लातूर शहरातील एका होर्डींग्जवरील बॅनर पडल्याने विद्युतवाहक तारा तुटल्याने लातूर शहरातील अनेक भागातील विद्युत पुरवठा रात्रभर खंडीत झाल्याची घटना घडली आहे.यावेळी सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरी भविष्यात बेकायदा जाहिरात फलक (होर्डिंग्ज) पडून जिवितहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या लातूर शहरात अनेक ठिकाणी जाहिरात फलक(होर्डिंग्ज)आहेत व नव्याने डिजिटल युनिपोल अवाढव्य स्वरूपात उभारण्यात येत असून लातूर शहर महानगरपालिका मालमत्ता विभागाने अटी व नियमांचे पालन संबंधितांकडून पालन होणे अत्यावश्यक आहे.मात्र मनपाच्या बांधकाम विभाग व विद्युत विभाग तसेच इतर तत्सम प्रशासकीय परवानग्या घेतल्या नसल्याची माहिती आहे.
त्यांचे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे,ज्यात एकूण जाहिरात फलकांची संख्या,स्थळ,मंजूर मोजमाप आणि प्रत्यक्षात असणारे मोजमाप यांचा स्वतंत्र आराखडा तयार करावा.राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या जाहिरात धोरणाची सक्तीने अंमलबजावणी करण्यात यावी व बेकायदा सर्व जाहिरात फलकांवर (होल्डिंगवर)त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे व कार्याध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी आयटी व अर्बन सेल शहरजिल्हाध्यक्ष डी.उमाकांत,विशाल विहीरे,आदर्श उपाध्ये,बसवेश्वर रेकुळगे,मयुर जाधव,विवेक पांडे यांच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली आहे..

Post a Comment
0 Comments