Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*हानेगावे परिवाराने केला मरणोत्तर देहदान संकल्प*

 माधव बावगे व चंद्रकांत गस्तगार यांच्या उपस्थितीत हानेगावे परिवाराचा मरणोत्तर देहदान संकल्प.

लातूर:-  

अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे व राष्ट्रसंत सत्यपाल महाराज यांच्या प्रेरणेने, भारतीय आयुर्विमा महामंडळ निलंगा शाखेचे विकास अधिकारी चंद्रकांत गस्तगार यांच्या उपस्थितीत, तगरखेडा नगरीचे सुपुत्र प्रदेश संघटक-जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र व संत गाडगेबाबा राष्ट्रीय महासचिव प्रबोधन मंचाचे सत्यवान निवृत्ती हानेगावे, पत्नी वैशाली सत्यवान हानेगावे, पुत्र विश्वजीत सत्यवान हानेगावे या परिवाराने डॉ. माधव लहाने (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) यांच्या सहकार्याने मरणोत्तर देहदानाचा फार्म विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे सर्व कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून देताना आपल्या मरणानंतरचा देहदान संकल्प पूर्ण केला. सोबतच माधव बावगे यांनी आपल्या व पत्नीच्या मरणोत्तर देहदानाच्या फॉर्मचे पुनर्जीवन केले.
आपले आयुष्य, आपला वेळ इतरांच्या भल्यासाठी खर्च करणारी, गरजूंच्या मदतीला धावणारी अनेक देवमाणसे आपल्या समाजात आहेत. गरजू व्यक्तींची मदत करुन दुसऱ्यांच्या कामी येण्याचा संस्कार त्यांच्या मनात खोलवर रुजलेला असतो. संपूर्ण जीवन समाज प्रबोधनासाठी वाहून घेतलेले मरणोत्तरही समाज हिताचे विचार करणारे व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहेत. हे पाहून समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा मिळते. 
हानेगावे परिवाराने मरणोत्तर देहदान  संकल्प करुन  खेडेगावातील व्यक्तिंना देहदान संकल्पाने मरणोत्तरही कुणाच्या तरी आपण कामी येऊ शकते. ही भावना रुजविण्यास प्रेरणा मिळेल.
निलंगा तालुक्यातील तगरखेडा हे गाव पंचक्रोशीत अवयवदान व देहदान संकल्पनेत नेहमी अग्रेसर आहे. हानेगावे परिवाराने मरणोत्तर देहदान संकल्प केला त्याबद्दल आम्ही तगरखेडकर ग्रूप तर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. नेहमी तगरखेडकरांनी अवयवदान व देहदान संकल्पनेत  पुढाकार घेतला आहे. 

येणाऱ्या काळात निलंगा तालुक्यातील सर्वात जास्त अवयवदान व देहदान करणारे व्यक्ती आपल्या गावातील असतील अशी भावना प्रत्येकांनी ठेवली तर ही जनचळवळ होण्यास वेळ लागणार नाही. 
देहदान, अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.  

Post a Comment

0 Comments