क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करून त्यांना बदनाम करू पाहणाऱ्या 'इंडिक टेल्स' आणि 'हिंदू पोस्ट' या वेबसाईटविरोधात बंदी आणून कठोर कारवाई करा... राष्ट्रवादीचे पोलीस अधिक्षकांना निवेदन
लातूर:-
महापुरुषों का अपमान,
नहीं सहेगा हिन्दुस्थान!
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करून त्यांना बदनाम करू पाहणाऱ्या 'इंडिक टेल्स' आणि 'हिंदू पोस्ट' या वेबसाईटविरोधात आज पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंदभैय्या सावे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.यावेळी पोलीस अधीक्षक यांच्याकडे या वेबसाईटवर बंदी आणण्याची आणि लेखकांवर व संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांतभैय्या पाटील,माजी नगराध्यक्ष ऍड व्यंकटजी बेंद्रे,शहर युवक अध्यक्ष समीर शेख,अनिल गायकवाड,विशाल विहीरे,सोहम गायकवाड,ऍड.प्रदिप पाटील,प्रविणसिंह थोरात,डी.उमाकांत,आदर्श उपाध्ये,ऍड.प्रदिपसिंह गंगणे,ऍड.सुहास बेंद्रे,राहुल बनसोडे,शकिल शेख,बबलू बागवान यांच्या सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments